Saturday, June 21, 2025

श्री

श्री 

अनुभवात टप्पे जे असावेत त्यातील संबंध ह्या क्रमाने शुद्ध होत असावेत - नाविन्य, स्थैर्य, वैराग्य आणि विलीन होणे. आपण पारखावे की कुठल्या टप्प्यावर आपला अनुभव खुणावतो आहे आणि दृश्याशी संबंध जोडतो. हे सारे टप्पे ओलांडून भगवंताचे दर्शन होत असावे. 

वरील टप्प्यांना साखळी म्हणावी किंव्हा परिवर्तन क्रिया किंव्हा बहिर्मुख ते अंतर्मुख होण्याची दिशा, किंव्हा अस्थिर ते स्थिरताचा प्रवास किंव्हा शुद्ध होत जाण्याची प्रक्रिया, किंव्हा अहं वृत्ती मंदावणे किंव्हा इंद्रिय ते जाणीव ही वाटचाल किंव्हा हेतू ते निरहेतू होत जाणे किंव्हा बिंदू ते प्रवाह जाणून घेणे किंव्हा विचार ते श्रद्धेचा प्रवास वगैरे.

म्हणजे अनुभवात बदल होणे शक्य आहे आणि वरील टप्पे हे सुचवत असावे की बदल होण्याचा मार्ग तो कोणता आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home