Monday, June 16, 2025

श्री

 श्री 


रुपात जन्म, वावर, बदल आणि मरण अशी क्रिया होते आणि ते कार्य भगवंताची शक्ती करते. त्या कार्याचे स्वरूप असे की अद्वैत अदृश्य स्थितीपासून ते द्वैत संबंधित स्थिती पर्यंत गती _जाणिवेत_ येतात. इथे जाणीव भावना मी अस्तित्व भाव म्हणून वापरत आहे. 

ह्याचा अर्थ की जाणीव द्वैत अनुभव निर्माण करू शकते किंव्हा अद्वैत स्थितीत स्थिर राहू शकते. 

पण हे फक्त गणित नाही. वरील कार्य विश्लेषण म्हणून उलगडीत केलं जातं ग्रंथान मधून किंव्हा संतान कडून. प्रत्येक रूपाला किंव्हा मनाला त्याचा त्याचा मार्ग शोधायला लागतो स्थिर होण्यासाठी. सर्व रूपांचे ध्येय अर्थातच एकच असले, तरीही तिथपर्यंत पोहोचण्याची वाट ही दृश्याचा संबंधातूनच निर्माण करायला लागते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून मार्ग वेगळे. 

सिद्ध करण्याची हौस प्रत्येकाला असते. ते ही कार्य भगवत इच्छेमुळे प्रकट होते. त्याच बरोबर असंख्य शंका ही प्रस्तुत केल्या असतात. आणि त्याच्यातून जाणिवेला शुद्ध कसे करावे, हे जोपासले जाते. 

म्हणून त्रास जो आहे, तो त्या करिता असतो. घटकांचा अर्थ काय असावा, तो प्रत्येकाने ओळखावा. जो अर्थ आपण देऊ, तो खरा वाटतो! इथे _अर्थ_ म्हणजे त्यात आपण विलीन होऊन त्याला कार्याचे स्वरूप देतो आणि क्रिया घडवतो. म्हणजे अर्थ खूप खोल ठिकाण्यातून बाहेर प्रकट होतो. अर्थ फक्त शब्दात न राहता आपल्या पूर्ण अंतरंगात भरलेला असतो. 

म्हणून शुद्ध होणे ही क्रिया पूर्ण अंतरंगात परिवर्तन करून घ्यायची असते. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home