श्री
श्री
सगळी सुरुवात स्पंदनातून होते आणि ती वासना चक्र, प्राण चक्र आणि आकार चक्र निर्माण करते. चक्र हा शब्द महत्वाचा त्यासाठी आहे, की सगळ गुंतलेलं, बदलणारं, तात्पुरते आणि त्यामुळे मर्यादित भासत. ह्या स्मरणाला आपण भाव म्हणतो. आपला भाव अहं वृत्तीचा आहे. तो भाव जसा शुद्ध होईल, तसा चक्राचा परिणाम बदलेल, स्मरण बदलेल, संकल्पना बदलेल, मन बदलेल आणि अनुभवाचे रूप बदलेल.
सध्याच्या जीवनात _मी_ हा भाव आणि शुद्ध भाव ह्यात फरक आहे. मी काही खरा नाही, ती एक निर्मिती आहे, जी वावरेल, गुंतले जाईल, बदलेल आणि विलीन होईल एक दिवस. म्हणून आलेल्या अनुभवाचे स्वरूप, ज्यात मी गुंतून राहतो, हे तसेच असते म्हणून त्या हालचालींना मी खरे मानतो, त्याला प्रतिक्रिया देतो वगैरे.
प्रश्न असा आहे की मग अनुभवाचे स्थान काय आणि अनुभव म्हणजे काय आणि त्याकडे कसे बघावे आणि कसे संबंध ठेवावे?
हे जाणून घेण्यासाठी नामस्मरण करावे.
0 Comments:
Post a Comment
<< Home