श्री
श्री
प्रत्येकाची स्थळाची आणि काळाची व्याख्या वेगळी असते. म्हणजे कुठल्या संकल्पनेतून, विचारातून, वासनेतून, वृत्तीतून दृश्य निर्मिती होते आणि संबंध जाणिवेत प्रकट होतात, हे प्रत्येकासाठी वेगळे असते. म्हणजे ते अपुरे, बदलणारे, गुंतलेले, तात्पुरते असे ही असते.
म्हणून व्यक्तीला समजून घेणे म्हणजे ती व्याख्या आपण धारण करणे असे होते. किंव्हा त्या व्यक्तीमध्ये जे गुण अथवा अवगुण असतील, ते आपण धारण करणे. म्हणून समजून घ्यायला मर्यादा असतात किंव्हा त्याने समाधान नाही मिळत किंवा आपण भीतीकडे वेगळ्या चष्म्याने बघतो! एखाद्या व्यक्तीची परिस्थिती पूर्णपणे समजुन घेण्यात, त्यातील सर्व घटक आपण समजून घेतो आणि ती परिस्थिती आपल्या जीवनात ओढून घेतो! असे आहे मनाचे स्वरूप!
म्हणून संत सांगतात की "विषय" किंव्हा दृश्याच्या नादी लागू नये, कारण त्यातून समाधान नाही आणि तात्पुरतेपणा जसा आहे, तसाच राहणार आहे! काही जीवनातील कोडी कळत नाही, त्याने त्रासून जाऊ नये किंव्हा चिंता करू नये. ते त्या क्षणाला न कळणे आपल्या हिताचे होते आणि ते नंतर कुठल्यातरी रूपात कळेल ही खात्री बाळगावी. म्हणजे सर्व कळून येते कधी ना कधीतरी. त्यासाठी उतावळे होण्याची गरज नाही.
कुठले रूप किंव्हा संबंध कसे सामोरे येतील ह्यावर श्रद्धा ठेवावी. स्थळ, काळ, पूर्वीच्या संकल्पना आणि उद्याच्या संकल्पना हे कसे उलगडतील ह्यावर श्रद्धा ठेवणे. आपण जसे शांत होतो, तसे हे सर्व संबंध समाधान देण्यासाठी उलगडतात. कशाचीही घाई करू नये.
शक्ती, हे चक्र आहे. त्याची एक क्रिया आहे आणि त्यातून होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचा परिणाम आहे. म्हणून आपल्या अनुभवात गोष्टी येतात आणि निघून जातात. गोष्टींचे होणे, वावरणे आणि निघून जाणे, ही नैसर्गिक आणि दैवी क्रिया आहे, म्हणून त्याला स्वच्छ मनाने स्वीकारावे. त्यात कुठलाही स्वार्थी हेतू ठेवू नये. जे आले ते येणार होते आणि जे जाणार ते जाणारच होते.
आपली वृत्ती स्थिर करावी - म्हणजे वरील हालचालींवर वृत्तीची भाषा अवलंबून करू नये. ह्याचा दुसरा अर्थ की श्रद्धा भाव प्रकट करावा, ज्यात वृत्ती शांत होतात आणि आपण निरहेतू पद्धतीने जीवनाकडे बघायला लागतो.
वरील सर्व जाणिवांना संत "नाम" असे म्हणतात किंव्हा नामाची शक्ती कार्य करते किंवा भगवंताचे अस्तित्व जाणून घेणे, असे सांगतात. भगवंताचे कार्य आहे, ह्याचा अर्थ वृत्ती शांत होणे आणि निरहेतू होणे.
Let there be no need to react to anything.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home