Monday, June 16, 2025

श्री

 श्री 


तीन विचार...

कार्य किंवा कुठल्याही घटकेत आपला वावर का होतो, त्यातून आपुलकीचे काही दोरे कारणीभूत असावेत. म्हणजे घटक अडवून न ठेवता, ते "येऊ देणे आणि वावर होऊ देणे आणि निघून जाऊ देणे". अशी भूमिका ठेवल्यामुळे नकळत आपले योग्य परिवर्तन होतं. परिवर्तन म्हणजे शांत होणे. ह्याचा हा अर्थ आहे की शांत होणे म्हणजे प्रवासातून जाऊन, अनेक परिस्थितीला सामोरे जाऊन, शांती संक्रांत होते. प्रवास अटळ आहे, मग तो शांतीने स्वीकारावे.

कुठलाही घटक, विचार, भावना, रूप हे इतर घटकां बरोबर गुंतले गेले असते. म्हणजे त्यात मुळातच हालचाल, गती, बदल, संबंध असे अनेक गोष्टी त्याला निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजे एकच गोष्टीतून निर्णय देण्याची घाई करू नये. सैय्यम हवा. ह्याचा असाही अर्थ निघतो की कुठल्याही गोष्टीचे मूळ दृश्यात मिळत नाही, किंबहुना ते अदृश्यातच असतं. म्हणून सर्व गोष्टी हे भगवत इच्छेने साकार होत असतात.

तिसरी गोष्ट ही की वासना शांत कधी होतील ह्याला भगवत इच्छा आणि कृपा लागते. म्हणून प्रयत्न करणे, एवढेच आपल्या हातात आहे - कशाचाही बाबतीत. योग्य परिवर्तन तो घडवून आणतो. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home