श्री
श्री
नाम घ्यावे. त्याने योग्य तो परिणाम होणार, कारण अस्तित्वात वावरणे, म्हणजे कार्य असणे/ होणे. कार्य हे प्रकरण सूक्ष्म स्थिती पासून ते स्थूल स्थिती पर्यंत प्रकट होते आणि खूप काही चक्र, भावना, विचार, संबंध, परिणाम घडवते. नुसतं पडून राहणे कुणाला जमलं आहे?! नुसतं बसून राहून सुद्धा जर पूर्ण शांती लाभत असेल, तर तो खरा भाग्यवान! मनाची वळवळ शांत कशी होऊ द्यावी, हे बघावे.
सध्या परिस्थितीत असे काही घडामोडी होत असतात, जवळच्या लोकांचे हाल बघताना, प्रेमळ माणसांचे यातना बघताना, नात्यातले लोकांचे होडीस्फीडिस ऐकून घेताना, खूप शाब्दिक टोचणे ऐकून घेताना, इतरांचे आगाऊ वर्तन झेलताना, कामात खूप बदल सोसताना....काय करणार असतो आपण ह्या साऱ्या गोष्टींचे? आहे का उत्तर कोडी सोडवण्यासाठीचे?!
तर बौद्धिक पद्धतीने नाही. बरं कोडी निर्माण कोण करतं?! मीच. ते का होतात? आपणं माणूस आहोत म्हणून. तर संबंध, परिणाम, त्रागा, सुख - दुःख, प्रश्न असणारच. मला एक कळलं आहे, की वरील सर्व क्रिया किंव्हा कठीण विचारांना दुर्लक्ष करू नये. ते येऊ द्यावे. ते एक दिवस मावळतीलही. दुःख, त्रास हे सूक्ष्मातून दर्शन देते, तर ते प्रकट होऊ पाहतात आपल्या मनोरचने प्रमाणे. ते व्ययक्तिक जरी खूप वाटले, तरी ते येऊ द्यावे आणि सोडून द्यावे. ते सोडूनच आपण स्थिर होतो. म्हणजे ते पकडून ठेवण्याची गरज नाही. त्याने काहीही निष्पन्न होत नाही. सोडावे कसे, हेच खरे शिकवण आहे. आणि त्यातून स्थिर होणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home