श्री
श्री
आयुष्याचे गणित आपण मांडत असतो आणि सोडवत बसतो! सत्य होऊ पाहणे गणिताच्या पलीकडे आहे.
आपले _गणिताची भाषा_ म्हणजे वासना, साखळी, चक्र, विचार, भावना, भाव, दृश्य, परिस्थिती असे आहे. थोडक्यात एकात एक संबंध जोडून एका जीवनाची परिभाषा निर्माण करायची. गणित जरी बौद्धिक देणगी असली, तरी समाधानासाठी गणिताच्या पलीकडे जायला लागते. आपण, अर्थ, संकल्पना, परिणाम हे सर्व घटक गणित म्हणून आपण बघण्याचा अट्टाहास करतो, म्हणून परिणाम भोगतो. The math of life affects us or we choose to let it affect us...
स्थिर होणे, जे संतांचे सांगणे आहे, ते ही गणित म्हणून बघता येत नाही. त्यासाठी कृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे का कदाचित, जो मार्ग सांगितला आहे, तो आहे श्रद्धा वाढवण्याचा. श्रद्धा वाढली की गणिताची जरूरी भासत नाही, त्यावर आपण निर्भर राहत नाही, त्यावर "मी" ही संकल्पना होत नाही.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home