श्री
श्री
आजकाल शांतीचे रसायन असे असू शकते की "मी" ची व्याख्या सामूहिक किंव्हा पर्यावरणीय विचारात अधिक मिसळावी, इतक की माझं असं काही वैयक्तिक किंव्हा देहाशी संबंधित विशेष काही राहत नाही.
शैक्षणिक जागेत असे करणे योग्य ठरेल असे वाटते. मुल इतक्या बदलणाऱ्या माध्यमातून शिकत असतात, की नेमकं माझ्यातून ते काय घेतात, ह्या चिंतेत राहण्यापेक्षा, शिकण्याच्या प्रवाहात त्यांना माझे काहीतरी टिंब भर योगदान होत असावे, अशी श्रद्धा ठेवावी.
Dnyan ही स्थळ किंव्हा काळाशी मर्यादित नसते, म्हणून कुठल्याही एका परिस्थितीतून, बिंदूतून, व्यक्तितून, क्रियेतून, रूपातून, संकल्पनेतून पूर्ण dnyan होणे अशक्य...त्याला प्रवाह मानावे. किंव्हा कुठल्याही घटकेला "निमित्त" मानावे, म्हणजे व्ययक्तिक संकल्पना जरा विलीन होण्यास मदत होते.
ह्याच्या पुढे जाऊन असे म्हणायला हरकत नाही की कुठलाही एक बिंदू ओढून पूर्ण dnyanechya वाटे आपण जाऊ शकतो. म्हणजे संकल्पना, साखळी, शिकवण्याची पद्धत, काहीही निवडा शिकवण्यात. त्यातील मूळ गाभा, जे अस्तित्व आहे, त्याला अनुसरून शिकवा. सत्याचे स्मरण लागते फक्त. ते कसे शिकवण्यात आणावे, ह्याचे उत्तर सरळ, बौद्धिक नाही. स्मरण ही गूढ क्रिया आहे. ती गुढपणे साखळी निर्माण करून क्रिया आणते. म्हणून स्मरण, ह्याला सर्वोत्तम भर द्यायला हरकत नाही. स्मरण स्पष्टपणे दाखवायलाच हवे, *असे काहीही नाही आणि त्याची गरजही नाही*. स्मरण त्याचे त्याचे कार्य करते. ते कसे, ह्याचीही चिंता असू नये. म्हणजे हे ओळखायला हवे की स्मरण व्यक्तिक कल्पना अजिबात नाही, म्हणजे तिला मर्यादा नाही. ती कायम असते आणि त्यातून प्रतिभा शक्ती आपण प्रकट करत राहतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home