श्री
श्री
सिद्ध होणे, हा अट्टाहास सोडावा. हा प्रवास आहे. रुपात, विषयात संबंधित आल्यामुळे कुठेतरी, सूक्ष्म पातळीपासून सिद्ध होण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मूळ इच्छा भगवंताची आहे. त्याला सिद्ध होण्यासाठी दृश्य भावाची निर्मिती त्यांनी योजिले आहे. सिद्ध होण्यास अनेक स्तर निर्माण होतात आणि एक, एक पायरी मध्ये तो अवतरून सूक्ष्म पासून ते स्थूल पर्यंत तो दर्शन देतो.
त्या पायरींचे उल्लेख हरि पाठात dnyanoba माऊली ने केले आहेत. त्या सर्व पायऱ्यांना "७ लोकं" असे म्हणतात. त्यांच्या मनोरचने प्रमाणे आपला सबंध दृश्याशी प्रस्थापित होतो.
म्हणजे आपला वावरण्याचा विस्तार ७ लोकात असतो. आणि जे दिसून येतं आत्ता, ह्या जगात, त्याच्या पेक्षा अनेक स्थितीत जगाचं अस्तित्व असते. अस्तित्वाला ७ स्तर आहेत, म्हणून आपली स्थूल स्थिती एक स्तर समजावी, ज्याचा एक स्वभाव आहे, परिणाम आहे, क्रिया आहे, संबंध आहे.
कसे जाणून घ्यावे इतर सूक्ष्म स्तर?
हरि ओम.
श्री
परिवर्तन होताना तेच दृश्य वेगळ्या रूपात प्रत्ययास येते. म्हणजे दृश्य भाव कल्पना आहे, जी बदलू शकते स्वतःच्या मनोरचने प्रमाणे. म्हणजे सर्व दृश्य एका दर्शनाची स्थिती आहे, जी आपल्या मनात चालू आहे - जसे आपण स्वप्नात वावरतो, त्या प्रमाणे!
त्या प्रकट होत राहण्याचे क्रियेचे _स्थान_ असतेच. त्याचे दर्शन सतत आपल्याला द्यावे लागते. गोष्टी येणार, वावरणार, निघून जाणार आणि हा प्रवाह आपल्या अनुभवात राहणार.
सांगण्याचे तात्पर्य हे, की हालचाली, गती, बदल, संबंध, ह्या कल्पनेत आपण राहणारच आहोत. ते कोड नाही, की जे सुटायला हवे, की त्यापेक्षाशी काहीतरी जागा असावी, की हा प्रकार तिथे घडणारच नाही!
मूळ प्रकार आहे, तो म्हणजे _जाणीव शांत होणे._ त्यातून सर्व काही बदलून, रूप बदलून, दर्शन बदलून जे येते, ते म्हणजे एक स्थिर, कायम, शांत माध्यम - भगवंत.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home