Sunday, July 06, 2025

श्री

 श्री 


कुठल्यातरी विषयाला धरून राहणे, हे गूढ प्रकरण आहे. त्याला कुणी काहीच करू शकत नाही. धरणे आणि प्रकट होणे, ह्याचे बीज अस्तित्व शक्तित आहे,  म्हणून ते असणार अनुभवात. म्हणजे दृश्याचा अनुभव त्या कारणामुळे प्रकट होत असावा. धरण्याला आपण क्रिया मानुया आणि त्यामुळे स्मरण होते. त्या क्रियेत खूप काही घटक, स्तर, साखळी, असायचे ज्यामुळे संबंधांचे भाव, रूप आणि आकारांचे दर्शन होऊ पाहते. 

दर्शन होण्यास हेतू नाही. तो प्रवाह ओळखावा आणि येत जाणे आणि निघून जाणे त्या *दर्शनाचा भाव मानावा.* म्हणजे आले तर आले, गेले तेव्हा गेले - ह्यावर व्ययक्तिक म्हणणे काही मांडू नये. एकंदरीत क्रियेचे स्थान व्ययक्तिक नसतंच, तर ते मनाला का लावून घ्यावे?

तरीही हा प्रश्न प्रज्वलित ठेवणे आले. भगवंत असतोच आणि त्याचे कार्य सदैव चालू असतेच. आपण वावरत रहावे आणि त्याचे स्मरण ठेवत रहावे. हे दोन्ही गोष्टी कसे जुळून येतील, ह्याची चिंता करू नये. 

काहीही जरी अनुभवात वाटले, तरी ते दर्शन आहे, हे ध्यानात रहावे, म्हणजे आपण कशालाही घट्ट धरून ठेवत नाही.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home