Saturday, September 27, 2025

श्री

श्री 

विषय करणे, बाऊ करणे हे सर्व साखळीतील घटक मानावे किंव्हा त्या क्रियेचा परिणाम. मनाची तळमळ जी असते, ती त्यामुळे होते, आपल्या स्वतःच्याच क्रियेमुळे. 

त्यातून internalisation ह्याचे स्थान होते आणि ते म्हणजे कसे असते, ह्यावर टीका किंव्हा अनुभव. ह्या बद्दल आपण बरेच काही बोलू शकतो, पण प्रामुख्याने अंतर्मुख होण्याची शक्ती आत्मसात केली तर विषय सुटावेत किंव्हा त्यावर जास्त लक्ष किंव्हा अपेक्षा केंद्रित नाही राहणार. 

म्हणून गुंतून घेतल्यामुळे विषय राहतातच. न गुंतणे हा ही पर्याय नाही. असे करू का तसे करू, हा ही चक्रात राहण्याचा भाग आहे. ह्यावरून कळेल की शांती संक्रांत होऊ देणे, ह्याला सैय्यम, अभ्यास आणि श्रद्धा लागू शकते. 

एक ध्यानात राहणे आहे, की वरील प्रवास, जी बहिर्मुख असते, मग जाणीव होणे त्या बद्दल आणि अंतर्मुख होण्याचा मार्ग मग निवडणे - ह्याला अजिबात दोष मानु नये आणि स्वतःला न्यूनपणा देऊ नये. सारे भगवंत करतो, म्हणून वरील अनुभवातून आपल्याला जाणे भाग आहे.

हरि ओम.

श्री

 श्री 


आपण वेगळं तसं काही करत नसतो. वेगळ करणे, वेगळं अपेक्षा ठेवणे, वेगळ्या स्थळी जाणे, वेगळ्या काळाची अपेक्षा ठेवणे, हा भ्रम आहे किंव्हा ती एक मनोरचना आहे. 

साहजिकच त्याचा उगम मन कसे कार्य करते त्यावर आहे. आपल्याला एका वेळेस, एकच गोष्ट दिसते, एकच चक्र दिसतं, एकाच भावात वावरतो, एकाच पद्धतीचे स्मरण होते. हे नैसर्गिक जगणे आहे मनाचे...ते तसेच होणार. म्हणून मागे काय, किंव्हा पुढे काय हे ध्यानात नसल्यामुळे आपण क्षणात खूप गुंतले गेलो असतो....आणि त्यातून "जोडावे कसे सर्व घटक ह्यांना" हा प्रश्न मनात येतो. 

त्याचा मार्ग कोणता? हा महत्त्वाचा प्रश्न आहे मनाने प्रस्तुत केलेला. कारण वरील क्रियेची मर्यादा जाणून घेतल्याने मन धडपड करते ह्या साखळीला अजून कैक पटीने " efficient" करायला. त्यातून संशोधनाची दिशा "production" कडे वळते, "maximization" कडे वळते किंव्हा "multi tasking" कडे वळते. 

पण प्रश्न असा आहे, की ह्याने परावलंबन संपते का? वरील संशोधन किंव्हा प्रगतीमुळे समाधान मिळते का? मनाच्या भाषेतून जे काही निर्माण करू, ते शेवटी परावलंबन भाव प्रज्वलित ठेवणार आहे. म्हणून उत्तर वरील संशोधनात साठवलेले नाही. 

सर्व वरील संशोधन एकंदरीत बहिर्मुख आहे...परिस्थितीशी निगडित. संशोधन अंतर्मुख केले गेले, तर अनुभव वेगळे होतील आणि कदाचित परावलंबित भूमिका शिथिल होऊ शकेल. तर तसे करून बघायला हवे.

दुसरी गोष्ट ही, की "मर्यादा" वरील क्रियेमुळे अनुभवात असणारच आहे. त्यातून सुटणे अशक्य. मर्यादेतून मार्ग निघतो, शांतीचा शोध होतो. मर्यादा पुसून टाकायची म्हणाली मनाने तर वाट्याला वेडेपणा यावा किंव्हा भान नसल्या सारखे जगणे होऊ शकेल. The foundation of morality is in context and limitations/ conditions. 

In architecture, there is a critical voice towards some people believing that there should be no context, which is quite stupid. Everything has a context, even abstract forms. But abstraction also comes *from* a context and isn't divorced from it. And perhaps abstraction is one of the greatest powers of the mind (to understand a pattern of action). 

Therefore the point is, one should be concerned about "peace in life" and what that means in whatever one engages with. 

हरि ओम.

श्री

श्री 

चांगल्या बरोबर वाईट विचार येऊ पाहतात कारण आपल्याला अधून मधून भगवंताच्या सूक्ष्म शक्ती बद्दल आठवण येते पण तिथे आपले मन स्थिरावत नाही, किंव्हा त्यातून बाहेर येऊन प्रपंचा बद्दल विचार मनात येतात, म्हणजे मन आकुंचित होते. थोड्या वेळाने परत सूक्ष्म होण्याकडे प्रवृत्ती होते.

हे सूक्ष्म पलीकडे होणे आणि परत आकुंचित होणे, आकाश आणि फिरणाऱ्या ढगां सारखे आहे. किंव्हा वस्तू दिसणे आणि "नाही" देखील. म्हणजे कृती वस्तूवर, व्यक्तीवर, रूपावर, आकारावर, साखळीवर, स्थळावर, काळावर आधारलेली होणे आणि सर्वांच्याही पलीकडे स्थित असणे. किंवा वस्तू ध्यानात आणणे म्हणजे तिथे चक्राची क्रिया केंद्रित होणे आणि वास्तूच्या पलीकडे स्थित होणे म्हणजे चक्राची गरज न भासणे. 

असे आलटून पालटून घडणाऱ्या परिस्थितीला ओळखणे. ते ओळखल्यावर, शांत भाव कायम संक्रांत होणे, हा मार्ग झाला. 

हरि ओम.

Shree

Shree 

स्वतःला दोष देऊ नये, कारण होणे, वावरणे, परिवर्तन होत राहणे हे पूर्ण आपल्या जाणिवेवर अवलंबून नसते. ह्या गोष्टी असतात, त्या चक्र किंवा हालचाली घडवतात आणि त्यांचे दर्शन संबंधातून आपल्याला होत राहते. 

आपण कर्तव्य करावे आणि सर्व भगवंताच्या इच्छेपोटी करत असतो, ही भावना वाढवणे. हा ही प्रवासच आहे. प्रवासात ह्या गोष्टी निराळ्या पद्धतीने मनात येतात, त्यात हेतू सामील असू शकतो, त्यातून क्रिया घडू शकते, त्यातून स्मरण घडू शकते. हे _कार्य आहे_. ते असणार. त्याला शांतीने स्वीकारावे. 

हरि ओम.


Shree 

Trust or to exist in faith is the opposite of determinism. Trust means to admit "I don't know who I am, what am I doing, where am I going but all is well". All is well only when the things are let to be and take a shape as they wish. The wish is attributed to a Divine Undertaking. 

Things can take any shape or any formalities and they would continue to interact or create cycles or connections. I am not determined by such happenings, which means, forces of such happenings have a far more mysterious origin than what the mind can believe. Mind is a phenomenon. Truth is above the phenomenon. So the phenomenon arrives, changes and goes away into something else. 

Hari Om.

Shree

Shree 

Idea, concern connections, cycle of being, continuance - such impulses can _create_ forms. Creation is partly about outward expression and partly about understanding our own situation of being. Or expression of any kind is a function of understanding the self. That is the core intent, I guess (and not in preferring to hold tightly to changing variables). The other tendency is born from fear.

Of course both tendencies of understanding and of fear aren't really separated. In the process of understanding, the journey is also about where fear originates and why. _The understanding and acceptance_ of these tendencies creates a peaceful state for us. 

म्हणजे हा *अंतर्मुख* होण्याचा प्रवास आहे. जे काही होते, जे काही प्रकट होते, जे काही संबंध निर्माण पावते, जे काही हालचाली दर्शन देतात, सर्वांचे उगम आतून असते. ते कळण्यासाठीही, आपली दृष्टी आपुलकीची हवी आतून येणाऱ्या स्पंदनावर - म्हणजे त्रासिक होण्यासाठी नाही, कष्टी होण्यासाठी नाही, कोडी सोडवण्यासाठीही नाही.  आतील क्रिया कळून घेण्यासाठी हेतू स्वच्छ हवा. 

तरीही हे सांगणे सोपे आहे, आणि करणे तेवढे सोपे नाही. त्याचे कदाचित कारण असे असावे की हेतू हा मिश्रित असतो, म्हणून अनेक भावना मनात येतात जेव्हा आपण आतील क्रिया कळून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण व्याकुळ होण्याची शक्यता असते. 

इथे ह्या सर्व भावना बरोबर श्रद्धेचा जोर आणि सैय्यम हवा. तो जोर कायम राहिला आणि स्थित केला की आपण शांत होतो. 

ह्याला सत्याचा अनुभव म्हणायचे.

हरि ओम.




Shree 

Above writing I have expressed with the hope to undertake the journey in that manner. The journey of fear and faith. 

While embarking on this journey, there are instances wherein the above concept may get forgotten (i would come to grips with some form of fear) and do some foolish stuff. It then would get followed by regret and to remind that such things ought not to be imagined in that way followed by the action of forgiveness. 

This is a cycle and perhaps the learning is that the cycle happens, the flow and urge to respond happens, these tendencies happen and there _need not be any expectations to stop disturbing thoughts_. 

What would happen, will happen and the cycle will continue to exist. That is the plan of Divine Will and that is what may be termed as _awareness_ (which is a form of 'motion' or a 'flow'). 

To better accept this situation and yet not to be disturbed at the core, remembrance of God is strongly advised to us.

Hari Om.

श्री

 श्री 


आत काय सुरू असते आणि त्याचे स्पष्टीकरण देणे हे अक्षरशः अभिप्रेत नाही दुसऱ्यांना बोध देण्यासाठी. स्पष्टीकरण हा मानवी भाव आहे, ज्याच्या अजून पलीकडे शांती भाव स्थित असतो. ह्याचाच अर्थ स्पष्टीकरण विलीन झाल्यावर किंव्हा विलीन होत राहताना शांती भाव संक्रांत होऊ पाहते. 

स्पष्टीकरण भावाचे मर्यादा आहेत, हे नैसर्गिक आहे. परावलंबनाचे स्वरूप काय असते आणि अहं वृत्ती, ह्याच्या क्रियेतून स्पष्टीकरणाची "गरज" निर्माण होते. 

शुद्ध अंतःकरण झाले की स्पष्टीकरणाची गरज विलीन होते. 

तसे पाहिले हा मार्ग महत्त्वाचा आहे. प्रपंचाचा अनुभव असतो, म्हणून शांत होण्याची गरज किंव्हा शोध निर्माण होते. ते कुणी सांगत नाही की असे करावे की ते करावे. ग्रंथ लिहिण्याचे प्रयोजन असे की *मार्ग दर्शन* व्हावे, स्पष्टीकरणाचा रंग प्रज्वलित न राहावे. 

काहीना तो मार्ग लिहून जाणवतो, काहीना आपुलकी व्यक्त करून, काहीना कार्य करून, काहीना कामातून.... _मार्ग निश्चित आहे_. तो जाणून घ्यावा.

हरि ओम.



श्री 

वरील लेखनाचे बऱ्याच पद्धतीतून चिंतन होऊ शकते...

प्रत्येकजण त्याच्या प्रवासात असतो. तो "त्याचा" प्रवास होतो अनंत क्रियेने. आणि हे "त्याचे" होणे आणि त्यातून "पलीकडे" स्थिरावणे हा झाला जीवनाचा मार्ग. ते होण्यासाठी जे अनुभव येऊ पाहतात, जी परिस्थिती असते, जे नाती असतात, जे प्रारब्ध असत, जे स्मरणात येऊ पाहते, ते एकंदरीत मार्गावर नेण्यासाठी _प्रवृत्त_ करते. प्रवृत्त हा भाव त्याच क्षणात कदाचित कळू नाही शकत (आणि कळण्याचाही अट्टाहास सोडावा). खूप त्रासातून जाऊन, वृत्तीचा परिणाम भोगून, जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा ती प्रवृत्त भावना जागृत होते, किंव्हा आपली बघण्याची नजर बदलते. म्हणजे आपण मार्गावर आहोत, हे खूप अनुभवातून गेल्या नंतर ओळखायला येतं...तरी ते भाग्य आहे आपले, हे निश्चित. कारण त्यातून आपण डोळसपणे अनुभवाकडे बघायला लागतो. ओळखणे ही बुद्धीची क्रिया फक्त नसून, ती जाणिवेशी निगडीत आहे.

आयुष्य हे सरळ नसते, किंव्हा ज्याला आपण सद्या सरळ समजतो, ते तसे नसते. असे का कारण वृत्तीमुळे मर्यादित कार्याचा अर्थ आपण लावतो. कार्य हा भाव सर्वांच्या पलीकडे स्थित असतो. म्हणून सरळ असण्याची जाणीव बदलण्याची गरज असते. 

आयुष्य सरळ असण्याची अपेक्षा म्हणजेच सर्व घटकांवर अपेक्षा लादणे - व्यक्तींवर, वस्तूंवर, भावनांवर, क्रियेवर, प्रगतीवर, काळावर, स्थळावर, फळावर वगैरे. तसा _अट्टाहास सोडून द्यावे._

अस्तित्व स्थिती भगवंताच्या शक्तीवर प्रज्वलित राहते, आपल्यावर नाही. म्हणून त्या शक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवण्याचा अभ्यास सतत करावा. गोष्टी होतात योग्य, आपण असो किंवा नसो, आपण काही करो किंवा नको. त्या होण्यावर श्रद्धा असू द्यावी.

कसे कार्य करावे, हे जरी कळले, तरी ते योग्य घडण्यासाठी सैय्यम आणि प्रयत्न आणि श्रद्धा लागते. कारण प्रत्यक्ष कार्य करत राहताना अनेक विचार मनात येतात आणि लक्ष वेधून घेऊ शकतात. म्हणून स्थिरतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक. 

काहीही लपवता येत नाही. आपण लपवण्याचाही विचार केला, तरीही त्यात इतर चक्र सामील होऊन त्या प्रकारची विपरीत परिस्थिती पुढे पदरी पडते. म्हणून सर्व विचार, हे भगवंतावर केंद्रित करावे, म्हणजे त्याप्रकारे योग्य परिस्थिती अनुभवायला येते.

हरि ओम.

Tuesday, September 23, 2025

Shree

 Shree

Tradition is living and is a process of realization. There maybe many ways of taking tradition ahead (to the new) and one can in fact say that the new is also a tradition to get into the mode of action. Which means we are referring to patterns, tendencies, impulses of actions. Then the inquiry becomes is there any criticality for impulsive act or should it only be let loose? Therefore every action of tradition or continuance or newness or memory constitutes a kind of a tension between the said values and creating a niche (whether the niche is a subset or something new, perhaps is realized “later on”). But first, there will always exist a need to create and through this creation, seek a sense of belonging. Like it or not, a person will seek the meaning of tradition, continuation, return, emergence, difference, validation, separation, belonging through any mode of thought, feel, action or simply being in this world. This action can’t be stopped and it is plain stupid to have some standardised expectation for the same.

Hari Om.

श्री

श्री 

प्रश्नावरून संबंधांचा अर्थ लागतो. प्रत्येक व्यक्ती हा प्रश्न घेऊन आला असतो, प्रश्नात वावरतो आणि प्रश्नाचा शोधत असतो. हे नैसर्गिक आहे आणि ते स्वीकारायचे असते. एखाद्या व्यक्तीला प्रश्नाचे स्वरूप असे का पडावे, हा सार्वजनिक चर्चेचा विषय असण्याची गरज नाही, असे माझे मत. अर्थात प्रश्न मांडण्याची मुभा द्यावी, त्यातून काय निष्पन्न होईल असा विचार असू नये आणि तो प्रश्न सर्वांना एकत्र आणू शकतो का, हे बघावे. 

प्रश्न असतात. ते नेहमीच सोडवण्यासाठीच असतात का, असे नाही. प्रश्न सोडवायला हवेच का, असेही नाही. प्रश्न आपोआप सुटतील का, तर शक्यता आहे. प्रश्नातून आपण स्वतःला दोष द्यावा का, तर तसेही मुळीच नाही. प्रश्न छोटा की मोठा, ह्या विचाराने दुसऱ्यांना लेखू नये. 

मानवी जीव म्हणलं, तर प्रश्न असणारच. आणि विघटन क्रिया मुळे ते येत राहणारच. 

प्रश्नांना शांतीने स्वीकारावे. ते सत्य खुणावत असतील!

हरि ओम.

Shree

 Shree 


Newness. Agitation or excitement of the mind can breed newness of things. The compulsion to create newness may become the cause of agitation. Related aspects are aggression, fragmentation, sharpening or isolation or separation and so on. This may be the popular idea of creation. 

However creation can also happen in finding peace, connections, wholesomeness, relations. In the action of creation "realization" can occur. This doesn't necessarily deal with newness but finding the thread in apparent conflicting situations or paradoxes. The result is calming things and the creation of empathy. Faith, trust, repetition may become some of the ingredients of this process. 

Therefore if one sees, creation is approached in different ways. One can breed agitation, whereas the other can bring peace.

Hari Om.

Shree

 Shree 


Memory can be spoken in many ways. One that is wholesome and the other which causes fragmentation. Both aren't mutually exclusive and hence the choice or predominance of one aspect can have an effect on the other. 

Generally, it is appreciated if memory seems to generate a feeling of belonging and peace. This is a process of engagement with people, mind, environment, relationships around us. I don't think that a person is weak if he/she prefers to seek happiness in all and as such strives for everyone's goodwill. At the same time, he/she is much aware of interactions of all things among themselves so is empathetic on his/her actions. Herein, memory seems to expand to infinite behaviour of space and time and is not merely contained "as a body phenomenon". Therefore, one is concerned about connections of generations and the past or the future seems equally valid as much as the present, or rather there are no distinctions as such. Hence memory is awareness. This entire idea can be seen as 'context of belonging'. 

The second idea is of speed, distinct entities, sequences, compartments, fragments, productions, noise and so on. That causes ruptures in space, time, us. That can cause inner violence. The issue of individual identity falls in this loop...something enforced by American idea of freedom and what situation that loop has landed us into. 

In modern mindscape there exists a debate of above two ideas. Infact the evolution of culture, humanity, perception, action, may suggest a gradual transformation in collective consciousness to fragmentary consciousness. _Which is better?_ 

This is for the self to _realise_, even to go beyond the idea of choice making. To see a situation as a binary of above ideas might be a mistake. Binary maybe an imagination. 

Steadiness is required, not a choice. 

Hari Om.

श्री

 श्री 


मला विघटन अनुभवायला येत आहे. प्रत्येक जण, कुठेही जा, त्याच्या कोषात, क्रियेचे स्पष्टीकरण नाही देणे, त्याला काही विचारले तर त्या व्यक्तीने प्रतिकार देणे, समजून घेण्यासाठी वेळ न देणे, सतत ओरडणे किंव्हा गप्प राहणे, ताबा मिळवणे, नियंत्रण न राहणे, काय महत्वाचे काय नाही असे ठरवणे अवघड होणे, सार्वजनिक चर्चेला दुय्यम समजणे वगैरे, असे जाणवते.... ह्याचा त्रास मला होतो कारण अशा वातावरणात चर्चा होत नाही, नुसते मतभेद होतात आणि विवेक बुद्धीला चालना मिळणे कठीण....आणि हे सर्व ठिकाणी आहे. 

ह्याचा अर्थ की समाजात खूप विघटन होत जात आहे आणि प्रत्येक कृती त्या वातावरणाचा छाप आणत आहे आणि परिणाम करत आहे. ह्याने अजून विघटन वाढेल आणि मनस्तापही. 

इथे प्रश्न असा निर्माण होतो की आपण व्यक्ती म्हणून काय करावे? कारण सध्या काहीही केलं, कितीही शुद्ध हेतू ठेवला, तरीही दुसरा त्यात स्वार्थी हेतू बघणारच आणि मतभेद व्यक्त करणार. म्हणजे दोघांमध्ये समतोल निर्णय गाठणे खूप कष्टाचे होत राहणार आहे. To resolve this you either keep on aggressively shouting or you completely withdraw and both actions are limited and harmful for the society. Actually those actions express personal intent.

तिसरा मार्ग हा की योग्य काय असावे ह्याचे भान ठेवून कर्तव्य करावे आणि फळ जे काही मिळेल ते स्वीकारावे. हे जे काही करत राहतो "आपण" ह्या पार्श्वभूमीतून आणि जे काही व्यवहार होतात, जी काही वैचारिक आणि भावनिक "साखळी" होऊ पाहते, ती भगवंताच्या माध्यमातून प्रकट होते. म्हणून परिस्थितीचा त्रास करून न घेता, आपण शांतीने कार्य करावे. 

अर्थात ह्याला अपार सैय्यम लागणार आणि श्रद्धा. त्यासाठी नामस्मरण करत राहावे.

हरि ओम.


श्री 

द्वैताचा अनुभव किंव्हा विघटनाचा अनुभव *गती* निर्माण करतो,बदल आणतो, चक्रात ठेवतो, विचार आणि भावना आणतो आणि प्रपंचात गुंतवून ठेवतो. हे एक प्रकाराचे स्मरण आहे त्या शक्तीचे. अर्थात हे कार्य आहे, जिथे विघटन ही क्रिया होत राहते, बदल असतात, संबंध येतात आणि प्रतिक्रिया देऊन परिणामांना सामोरे जायला लागते. 

अशा सऱ्या मनस्थितीत वावरत राहताना आपल्याला सत्य कळणे महा कठीण, कारण आपण वेगात इथे तिथे जात असतो (वृत्ती आणि विचार) आणि कुठलातरी स्वार्थी हेतुला धरून ठेवतो. हे धरणे जे आहे, ते खूप गूढ क्रियेतून उद्भवते ज्यात अनेक स्तर, साखळी, चक्र, इंद्रिये, देह संबंधित असतात. म्हणून त्यातून सुटण्यास किंव्हा शांत होण्यास प्रयत्न आहेत. 

शांत होणे म्हणजे सूक्ष्म होणे आणि गती विलीन होणे. ते झाल्यास सत्य आत्मसात होते. तो पर्यंत आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करून अंतर्मुख होत राहणे. 

जी प्रपंच किंव्हा परिस्थिती दिसते, त्यात गुंतून मिळून काय मिळते?! ते चक्रच आहे! त्याला ठोस अशी काही सुरुवात नाही, आणि अंत ही नाही!...कारण हे *कार्य* आहे, भगवंताचे आहे. कार्य असण्यास हेतू नसते, ते फक्त असावे. अस्तित्वात अशी एकच गोष्ट असावी की नुसती असते,  आणि ती म्हणजे "शांती". 

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्वाचे कार्य एक असे आहे की सिद्ध होण्याची क्रिया, काहीतरी होत राहण्याची क्रिया. त्या होण्यामध्ये अनेक घटक, स्तर, चक्र, भाव, वृत्ती ते आकार अशा गोष्टी संबंधित होतात. आपल्या जाणिवेत आपण ह्या कार्याला निरनिराळे नावे संबोधतो, जसे की भगवत इच्छा, शक्तीचे कार्य, मर्यादा, घडामोडी, परिस्थितीचे होणे, जीव आणि इतर आकार, दृश्य भाव, तात्पुरतेपण, वेगळेपण, वगैरे. 

ह्यातून हे कळेल की आपण एका स्थितीच्या प्रभावाखाली वावरत असतो आणि त्यातून विचार आणि भावना आणि देह पदार्पण करतो. हे पदार्पण करण्याच्या गोष्टी "घेतल्या आहेत", ते "उपजत नाही आहेत".

म्हणून प्रश्न असा आहे की मूळ तत्व किंव्हा मूळ स्वभाव तो कोणता? असे म्हणतात की मूळ स्वभाव आहे तो भगवंताचा - सूक्ष्म आणि शांत आणि एकच सत्य. त्यातून आपला जन्म होतो किंव्हा एखादे _रूप_ "धारण" करतो. त्याला धरून राहिल्यामुळे होणारे परिणाम आणि स्मरण. 

ह्याला आपल्या मर्यादेच्या चौकटीत "अनुभव" म्हणतात. आपण त्यात मुल्य घालतो आणि अनुभवाची बाधा होते. अनुभव म्हणजेच "मी" किंव्हा माझा स्वभाव, अशी समजूत होते. 

हे जसे कळून येते, तसा विचार होतो की ह्या परिस्थितीत काय करावे? त्यासाठीचा उपाय सांगितला आहे नामस्मरण.

हरि ओम.

Tuesday, September 16, 2025

श्री

 श्री 


आपल्याला बोलण्याची भूक असते कारण त्यातही कारण गूढ असते. त्याला आपण _कारण_ शोधतो आणि "भगवंतावर" असे सोपवतो. हा झाला तर्क. तो सत्यात बदलू पाहणे, हा झाला अभ्यास. 

अंतर्मुख होताना देखील बदल आणि तात्पुरतेपण जाणवतात. त्यानेही भीती किंव्हा बेचैनी वाटू शकते. ती मलाही वाटते. काय करू ह्या विचारांचे असेही मनात येते. कुणाशी बोलू असेही वाटते. त्यातही अपेक्षांचा रंग असावा, म्हणून असे विचार कदाचित. 

ह्या वरील प्रकाराला स्वतःला दोष न देता बघायला हवे. म्हणजेच की परिस्थिती किंवा अनुभव हे अस्तित्वातील असणारे घटक स्वीकारावे आणि आपण कार्य करत राहावे. त्याचे फळ भगवंतावर सोपवावे आणि जे काही त्यातून घडेल (चक्र म्हणून) ते शांतीने स्वीकारावे. 

हरि ओम.

Monday, September 15, 2025

श्री

 श्री 


कशाने काय होईल, ते सिद्ध होण्यासाठी, स्वार्थी हेतू सांगण्यासाठी, अट्टाहास धरण्यासाठी सांगू नये किंव्हा प्रतिक्रिया देण्यासाठीही नाही. जे काही होते, ते शक्तीमुळे होते, हे ध्यानात ठेवावे. आपले होणे, अनुभवाचे स्थान, बदलांची जाणीव - सर्व एका शक्तीच्या कार्यामुळे *संक्रांत* होते. Those things *exist*. अस्तित्व म्हणलं तर क्रिया आली आणि ती निरहेतू असल्यामुळे (म्हणजे कुठल्याही रुपावर अवलंबून नसल्यामुळे) ते कार्य सुचविते. तसा भाव संक्रांत होण्यासाठी मनाला ते संस्कार द्यावे लागतात. तो भाव शांत, अदृश्य, विशाल, सूक्ष्म आणि स्थिर असतो. 

तो भाव अस्तित्वात असतोच, ज्याने आपण होतो. तो कसा कार्य करतो, हे ध्यानात नसते आपल्या. वृत्ती देखील सूक्ष्म असते आणि तिचे कार्य विचार आणि भावना प्रकट करते. वृत्ती कुठे गुंतुन राहते, हे सूक्ष्म झाल्या शिवाय उमगत नाही, म्हणून व्यक्ती अशी प्रतिक्रिया का देते, त्याचा स्वतः अभ्यास करावा, दोष देऊ नये दुसऱ्यांना. 

म्हणून शुद्ध होणे हा मार्ग आहे आपल्यासाठीचा. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

मन असते, विचार आणि भावना हे येत राहतात आणि निघून जातात. त्यातून संबंध होत राहतात, जाणीव वावरत राहते आणि कार्य घडत राहते. हे सर्व शक्ती करते, जे त्या शक्तीचे कार्य आहे, परिणाम आहे, वावर आहे, संबंध आहे, इच्छा आहे, भाव आहे. त्या कार्याच्या द्वारे "माझेपण" उद्भवते आणि त्या मूळ शक्तीचे कार्य "आपण विसरतो", म्हणून वेगळ्या स्मरणात आपण कार्य करतो. Imagination. त्याला आपण _अनुभव_ म्हणू शकतो. अनुभवाचे स्थान राहणार आणि त्याचा परिणामही. तरीही अनुभवाकडे प्रमाण म्हणून बघायला लागलो, तर मूळ शक्तीचे स्मरण अनुभवात संक्रांत होऊ शकते. 

माणूस चुकीच्या समजुतीमुळे खूप साऱ्या विचार आणि भावनांना बळी पडतो, त्यात गुंतून राहतो, त्रासिक होतो, कष्टी होतो. ह्या परिस्थितीत स्वतःला शांतीने स्वीकारणे आले. आपल्या आत संक्रांत झालेल्या प्रवाहाला हेतू नसतो, म्हणून कुठल्याही हेतूने व्यवहार करण्याची गरज नाही. बदलांचे स्वरूप असे का, हा प्रश्न हेतू दर्शवतो. परिस्थिती, हालचाली कसेही झाले, तरी त्यास व्ययक्तिक नजरेने बघू नये. त्यासाठी सूक्ष्म होणे आले.

आणि त्यासाठी नामाचे स्मरण ध्यानी ठेवावे.

हरि ओ

Sunday, September 14, 2025

श्री

 श्री 


रूप निर्माण होते, आणि त्यातून क्रिया आणि स्मरण. हे कार्य खूप गूढ आहे आणि *शुद्ध भगवत शक्तीचे परिवर्तन* होऊन ते स्थूलात अवतरते. प्रत्येक स्तरात संबंध होतो, त्या संबंधाची भूमिका होते, तिचा परिणाम होतो आणि त्या प्रक्रियेत "भाव" होतो (किंव्हा अहं वृत्ती, वेगळेपण, मर्यादा, बदल, हालचालींची जाणीव, तात्पुरतेपण). म्हणजे आपले मन कुठल्यातरी स्थितीच्या कार्याला "धरून" ठेवते. त्याला धरून राहिल्याने, त्या स्थितीचे "संस्कार" मनात रुजू होतात आणि तसे परिणाम आपण भोगतो, त्या प्रकारे विचार करतो, तसे भावना होतात. भगवंताच्या कार्यात असे आहे की त्या प्रक्रियेमुळे रूप किंव्हा जीव होतील (आणि स्मरणही त्या प्रकारे होईल) म्हणून भगवंताचा "विसर" त्या रूपाला होईल (वेगळेपण आणि तात्पुरतेपण) आणि कधीतरी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव त्या जीवाला झाली की तो परत योग्य मार्ग निवडून शुद्ध होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे भगवंताचे स्मरण वाढवत जाईल आणि ते रूप विलीन होईल. 

भगवंत आपल्या अनुभवातला, जीवनातला, परिस्थितीतला एक घटक ओळखायला हवा आणि कालांतराने मुख्य घटक तो आहे, आणि त्याच्या पुढे "तोच" आहे, अशी प्रचिती व्हायला हवी. 

अनुभव म्हणून टप्पे, प्रवास, प्रवाह, स्मरण, प्रमाण, प्रसाद, अर्पण - असे बघायला लागते, सिद्ध होण्यासाठी किंव्हा हेतू प्रज्वलित ठेवण्यासाठी *नाही*. 

त्या पद्धतीने अनुभवांकडे बघण्यासाठी नामस्मरण करत राहावे.

हरि ओम.

Shree

 

Shree

Generally I think actions are always long term or continuos, connected and originating from consciousness. Instant action is a misnomer. Or rather expectation of any kind is a misnomer. Our expectation over the actions we perform muddles its quality. Purest of actions come from bliss. I think we also mistake in considering what exactly makes an action and how should it be seen as a process and a product. The mistake perhaps is natural process of understanding the truth of this question and hence mistakes and their consequences are inevitable. Even if anyone says anything to the effect of implying an immediate action or a response, it is “not necessary” to comply to that intent and even if nothing seems to get done, it doesn’t mean that we seem misfit for the operation. Each one is going to approach the idea of action in his/her own way. What another person imagines an action is not something I might agree to and hence the reponse that I may offer might be different from what that person expects. But whose problem is that?! And is it a problem in the first place?!! I am saying this to myself, for I tend to do whatever immediate expectations the other seeks from me and this may also have a deeper reason why do I react in desperation. Why? This requires to be observed - this tendency for its own sake. And personally speaking, I may not feel peaceful unless I accept how this desperation seems to develop and that need not define who I ought to be. Nothing that is done is currently resolving this tendency – be it looking inward or outward. Even this expectation needs to be dropped and that too might be a process in itself. Till then, some form of desperation may exist and may urge me to respond. It’s a pressure that needs to diffuse and be accepted.

Hari Om.

Saturday, September 13, 2025

श्री

 श्री 


आपण भगवंताचे आहोत, हे जाणून घेणे. आपण जे इथे आलो, वावरत असतो, संबंधात येतो, बदलत राहतो, परिवर्तन पावतो, अनुभव घेतो, परिमाणात राहतो - ही पूर्ण त्याची इच्छा आहे. कश्यामुळेही अहं वृत्ती प्रज्वलित असण्याची गरज नाही. ती काल्पनिक आहे, म्हणून ते सत्य नाही. म्हणून तिला विलीन करता येते. त्याचे गाठोडे का सतत घ्यावे?! अस्तित्व भाव हे कुठलेही स्तरातील रूप नाही आणि त्यामुळे होणारे परिणामही नाही. म्हणून अनुभवांचे ओझे, परिणाम, भोग, परिस्थिती 'आपण' नाही. मी इथे का आलो, कसा आलो, कुठे जाणार, काय होणार, काय अनुभवणार, काय स्मरणात ठेवणार, कशी प्रक्रिया देणार - ह्याला हेतू का ठेवावा? भगवंताकडून येते, भगवंताकडे जाते, भगवंताची इच्छा आहे, भगवंताने दिलेले अनुभव आहेत. म्हणून भगवंत सुरुवात, मध्ये, शेवट - सर्व ठिकाणी, स्थळात, काळात असतो, हे पक्के मनात धरावे. 

हे मनाला सांगण्यासाठी सतत नाम घेत राहणे. नामाचे स्मरण ठेवावे. बदल, स्थळ, काळ, दृश्य ह्याने अजिबात व्याकुळ होऊ नये आणि स्वतःची व्याख्या _त्यामुळे_ करू नये. 

हरि ओम.


श्री 

स्पष्टीकरणाची अपेक्षा किंव्हा शुद्ध होण्याची अपेक्षा सुद्धा स्वतःला त्रास देऊ शकते किंव्हा कटु बनवते. संबंध, अनुभव, परिस्थिती, स्तर, बदल, भाव हे आपल्या वावरण्यात असणार. त्यातून परिणाम होणार, जिचा भाव तात्पुरतेपण असते. त्या भावनेचे पाया मुळे समजत नाही आणि कुठल्याही रूपात किंवा आकारात ते स्थित किंव्हा साठवलेले नसते. म्हणजे सर्व कार्य भगवंताचे आहे, हे स्वीकारणे. भगवंताचे आहे, म्हणजे त्याला सर्व अर्पण करावे आणि काहीही साठवू नये, कुठलाही हेतू बाळगू नये. हालचाली भगवंताकडून प्रकट होतात आणि तिथेच परत जातात.

बदलणारे असल्यामुळे मी आणि कुटुंबाशी संबंध बदलत राहतात. त्यात कैक तात्पुरते संकल्पना अनुभवात येतात. ते पुरवायला जाऊ नये आणि त्यातून स्वतःची व्याख्या करू नये. तब्येती, आजार, वृत्ती, शब्द, क्रिया, ह्याने व्याकुळ होऊ नये. त्यांना कार्य करण्या प्रमाणे बघावे.

कामात आपण खूप कमी पडू शकतो, पण सर्वांना पुरून उरणे, हे काही ध्येय नाही आपले. मी काही सांगितले, किंव्हा नाही, दृश्यात गोष्टी एका प्रकारे झाल्या किंव्हा दुसऱ्या प्रकारे, विषय वाटले, तरी त्याने व्याकुळ होऊ नये. जे दिसते, ते सर्वस्वी खरे नसते, म्हणून त्यात फक्त प्रयत्न अपेक्षित ठेवावे, फळ नाही. 

जवळच्या व्यक्तींचे वावरणे कसे होते, त्याने बेचैन होऊ नये. ते बोलतात, आपण ऐकावे आणि इथे कार्य संपते. मी काहीतरी करीन किंव्हा नाही, मी आता करीन किंव्हा नंतर, ह्याने आपण स्वतःला ठरवू नये. व्यक्तींचे व्यवहार त्यांच्या नशिबाने होते. आपले व्यवहार आपण निश्चयाने शांतीने करू. व्यक्तींचे जग भगवंतामुळे येते. त्याला आपण कारणीभूत मानू नये. त्या जगात आपला काय संबंध असतो, हे भगवंताच्या इच्छेवर असते, म्हणून शांत असावे. सर्व ठीकच असते, योग्यच होते. 

देह बदलतो, वाढतो, वाळतो, झिजतो. त्याचा परिणाम होऊ देऊ नये. दृश्यात येणाऱ्या सर्व गोष्टींचे तेच होते. त्यात आपली शांत टिकवावी. 

हरि ओम.

श्री

 श्री 


अध्यात्माचा अनुभव, "मी" ह्या संकल्पनेतून जाणवू शकतो. म्हणजे हा अनुभव बाहेरील परिस्थितीशी अवलंबून न ठेवता, तो अंतर्मुख - साखळी, घटक, स्तर, भाव, आत ते बाहेर असे होऊ पाहणारे संबंध ह्यांच्याशी जडलेला आहे. ह्यालाच कदाचित "आत डोकावणे" असे सुचविले आहे. 

"मी" होणे, वावरणे आणि निघून जाणे (परिवर्तन पावणे, बदलत राहणे, स्तरात जाणे) हे *अस्तित्वाचे कार्य ओळखायला हवे.* म्हणजेच असे जाणवायला हवे की असे अनुभव _होत राहणार_ , आणि त्याला "हेतू" ही संकल्पना जोडून उपयोगाचे ठरत नाही, ती भगवंताची शुद्ध इच्छा मानावी. तसे आत्मसात करणे, म्हणजे "मी" ह्या लोहचुंबक संकल्पनाला विलीन करणे, शिथिल होऊ देणे. 

जस जशी "मी" ही संकल्पना शिथिल होऊ पाहते, तशी जाणीव शुद्ध होते, त्या प्रकारे विचार आणि भावना देहाच्या पलीकडे होऊ पाहतात, ते विशाल होतात, सर्वांच्या भल्यासाठी होतात. 

मूळ प्रकरण काय आहे, ते रुपाशी निगडित आहे. त्या रूपातून स्मरण, हेतू, क्रिया, परिणाम असे कार्य चालू राहते. ते रूप म्हणजे अनुभवाचे स्वरूप, जे तात्पुरतेपण, वेगळेपण दर्शवते. म्हणून त्यातून होणारे विचार आणि भावना. म्हणून तो राग, दुःख, सुख, धडपड, भीती, चिंता, काळजी, कष्ट वगैरे. त्यामुळे _प्रकट होऊ पाहणारे विषय, कोडी, सोडवण्याचा अट्टाहास_. हे *काल्पनिक आहे*. म्हणजे ते खोटे नाहीत, पण स्वतः निर्माण केले गेलेले विषय आहेत, म्हणून त्यात परिवर्तन होऊ शकते. 

दुसरी गोष्ट ही की अस्तित्वाचा परिणाम खोलवरून उमटत असतो, म्हणून बदलांची भावना खूप आतून येत असते. म्हणून बेचैन वाटणे किंव्हा कसलीतरी काळजी वाटणे ही भावना गूढ आहे, आतील आहे आणि ती शेवट पर्यंत असावी, म्हणून ती पूर्ण स्वीकारावे. ती सोडवायला जाऊ नये. 

मला वाटतं की सर्व भावना आतून येत असतात, साखळीत असतात आणि एकमेकांशी चारही बाजूने संबंधित असतात. त्याला सोडवण्याचा अट्टाहास आपण करतो आणि तिथे आपली चूक होऊ शकते. सोडवणे म्हणजेच की आपण वेगळे आहोत हे गृहीत धरणे आणि त्यामुळे जी काही वस्तू त्रास देत आहे, ती गाठ सोडवण्याचा आटापिटा करणे. It is like fighting against your own self. 

Therefore the entire "situation" is about "acceptance" of the self as a vibration. हे स्वीकारणे म्हणजे अधिकाधिक अंतर्मुख होणे, सूक्ष्म होणे, भगवत स्वरूप होणे, विलीन होणे, स्थिर होणे.

हरि ओम.

श्री

 श्री 


साखळी जरी माहीत झाली, तरी तो संबंध (किंव्हा कुठलाही संबंध, त्याचे रूप, परिणाम, स्थळ, आकार, बदल, चक्र, भाव) भगवंताच्या इच्छेने झाला असतो. म्हणून बुद्धीने जरी सर्व मांडता आले, तरीही आपुलकी श्रद्धेच्या भावनाने प्रकट करायला लागते. 

श्रद्धा म्हणजे भगवंताच्या शक्तीवर पूर्ण विश्वास, त्या गूढ प्रक्रियेवर विश्वास, पूर्ण स्वीकार, स्थिरावणे, सूक्ष्म होणे, विशाल होणे, पलीकडे होणे, शुद्ध जाणीव होणे. 

झाडाला पाणी दिले की ते वाढते. भगवंताचे नामस्मरण केले की जाणीव शुद्ध होईल, त्यात दुमत नाही. आपण परावलंबनाच्या प्रकारांवर चिकित्सा करू शकतो, किंबहुना ते होणे आहे. त्यातून जाणीव शुद्ध होण्याचीही शक्यता आहे. विचार जरी केला, तरी शांती भाव प्रकट होऊ देणे, म्हणजे हे सतत ठरवायला लागते की बुद्धीची मर्यादा काय, हेतू काय आणि श्रद्धेवर काय सोपवावे. 

थोडक्यात अस्तित्व शक्ती स्वतःचा विचार करते. 

हरि ओम.


श्री 

मूळ प्रश्न जर बघितला तर तो असा असावा की अस्तित्व भाव काय आहे, ते काय करतं आणि त्यातून परिणाम कसे होतात? मग त्यातून स्मरण, अनेक स्तर, घटक, साखळी, बदल, संबंध, रूप, आकार, जाणीव - ह्या काही संकल्पना त्यातून निघून येतात. त्यात अंतर्मुख अनुभव आणि बहिर्मुख अनुभव हे उद्भवते. दोघांचा स्वभाव वेगळा असल्यामुळे, त्यातून होणारे कार्य आणि परिणाम वेगळे असतात. 

इथे कुठेतरी मनाच्या शक्तीची व्याख्या दडलेली दिसते आणि मन काहीतरी धारण करत राहते, असे दिसून येते. Imagination. मन कधीही मोकळे राहणार नाही, म्हणून अस्तित्वाच्या नियमानुसार कुठल्यातरी कार्यात मन गुंतून राहत.  कशात ते गुंतून राहत, त्यावरून संस्कार ठरतात, परिणाम ठरतात, स्मरण ठरतं आणि विचार आणि भावना. 

सांगण्याचे प्रयोजन एवढेच की ह्यावरून एकत्रित होणारी जाणीव आणि विघटित होणारी जाणीव हे मुख्यतः अस्तित्वात वावरण्याचा स्थिती आढळतात. दोघांचा परिणाम विलक्षण होतो स्वतःवर. त्यावरून कुठला परिणाम योग्य म्हणावे, हे ओळखावे. 

तात्पुरतेपण, वेगळेपण आणि त्यातून होणारा त्रास, चिंता, काळजी, राग, लोभ, अट्टाहास, हे सर्व विघटित क्रियेचे लक्षण आहे. त्याच भाषेत कोडे सोडवणे महा कठीण, कारण ते तात्पुरतेच राहणार असते.

त्या भाषेच्या *पलीकडे* कार्य करणे आणि एकत्रित शांत सत्य प्रकट होणे, हा योग्य मार्ग समजावा. पलीकडे जाण्यास/ होण्यास स्वतःला थांबवू नये. योग्य परिवर्तन म्हणजे पलीकडचे सत्य जाणिवेत येणे. 

आजच्या परिस्थितीत काय दिसून येते की विघटित क्रिया आणि त्यामुळे होणारा विलक्षण वेग, बदल, हे सामोरे येते. ह्या चक्राच्या पलीकडे कसे होता येईल? 

त्यासाठी नामाचा नेम धरावा. तो योग्य मार्ग सुचवेल. मार्ग सोपा नसावा, पण योग्य असावा. शांती भाव सुलभ कधीच नसतो. तिला प्रयास, सैय्यम, श्रद्धा असे घटक लागतात आणि भगवंताची कृपा. 

बदलांवर, परिस्थितीवर, वस्तूवर, व्यक्तीवर रागावून मनस्ताप आपलाच होतो. शांतीने सर्व करावे. ते आपले ध्येय मानावे. 

हरि ओम.

Tuesday, September 09, 2025

श्री

 श्री 


मला दररोज स्वतःला सांगायला लागते, की उत्तर देणे किंव्हा प्रतिक्रिया देणे अभिप्रेत नाही. देहाचे वाढत्या व्याधींचे प्रश्न म्हणा, बुद्धीचे प्रश्न म्हणा, भावनांचे प्रश्न म्हणा, लोकांचे प्रापंचिक समस्या बघा, कामाची व्याधी बघा, दररोजच्या बदलांचे रूप बघा.....आपण उतावळे होणे अपेक्षित नाही. कर्तव्य अवश्य करावे, पण त्यातून घडणाऱ्या फळांना मनाला लावून न घेणे. 

दररोज उठल्यापासून ते निजेपर्यंत समस्या किंवा कोडी दिसून येतात - व्याधी, वृत्ती, स्वभाव, काम, हेतू, परिणाम, मान किंव्हा अपमान...काहीही असो. प्रत्येक गोष्टीशी झुंज करायची ठरवली, तर दमणूक होईल आणि मग प्रश्न असा येतो की हे अभिप्रेत तरी आहे का?!  आणि एवढं का मागे लागून घेणे आणि कोडी सोडवण्याचा अट्टाहास धरणे? प्रश्न गूढ आहे...उपाय कुणीही ह्यावर सहज देऊ शकेल गणिता सारखे, आणि मग आपल्याला वाटेल की आपण मूर्ख होतो की इतके साधे करू शकलो नाही. 

वस्तुस्थिती ही आहे, की आपण खूप गुंतले गेलो असतो कुठल्याही परिस्थितीत, म्हणून कोणताही बाहेरील उपाय योग्य ठरत नाही. ह्यातूनच अभ्यास असतो, की मार्ग कसा असावा हा सर्व गोष्टींकडे बघण्याचा? आणि मग तो अनुभव घ्यायला लागतो. 

हरि ओम.

श्री

श्री 

भाव हा भाव असतो जाणिवेचा. त्याला परिस्थितीचे *कोणते आणि किती आणि कसे घटक लागतात*, हे फारसे महत्त्वाचे नाही. अर्थात घटक काळानुसार बदलत राहतात, म्हणून स्पष्टीकरणेच्या दृष्टीने तोच भाव नव्या भाषेत काळाच्या ओघात मांडायला लागतो, तर तो दुसऱ्यांना पटतो. ह्याचाच अर्थ की भाषा हे बहिर्मुख अंग असावे अस्तित्वाचे, जिच्यावर बुद्धी संबंधित असू शकते. म्हणजे बुद्धी बहिर्मुख ठरली. 

परतू, जाणीव अंतर्मुख भाव आहे, जो भाषेच्याही पलीकडे वावरत असतो, जास्ती सूक्ष्म असतो, जास्ती विशाल असतो, जास्ती स्थिर असतो. जाणीवेच्या बळावर प्रपंच केला तर शांती भाव डळमळणार नाही. 

आता हा भाव बुद्धी सारखा वागत नाही सूक्ष्म असल्यामुळे, म्हणून तो काळाच्या आणि स्थळाच्या मर्यादांच्या पलीकडे *बघू* शकतो आणि तसे परिणाम त्यावर होतात. म्हणून दररोजच्या बदलणाऱ्या प्रपंचात हा भाव विशेष संबंधित नसतो किंव्हा अवलंबून राहत नाही. 

आपण त्या भावाची जाणीव करून घेऊ शकतो का? सर्वांचा त्याग केला, की हा भाव फुलतो, ध्यानात येतो. म्हणून त्याग करणे म्हणजे कोडी सोडवण्याचा आटापिटा सोडून देणे, श्रद्धा वाढवणे, भगवंताच्या कार्याचे खरेपण मानणे. 

सारांश: परिस्थितीचा आणि भगवंताच्या अनुभवाचा रूपाशी संबंध थेट नसतो कदापि. त्याला श्रद्धा वाढवणे हाच मार्ग आहे. कालांतराने भगवंताचे दर्शन घडून येते. 

हरि ओम.



Shree 

भाव is a *visualization* of existence. In a way, awareness, visualization, process, reality, existence can't be separated. 

Perhaps the most fundamental visualization is that of space and time - as these are extremely experiential aspects for us and not abstract entities. Space and time (and therefore us and architecture) depend on our state of mind/ memory/ awareness of being. 

The critique of fragmentation is that awareness becomes such, that it leads to a knee jerk reaction and subsequent effects that have no end. The essence of Truth is that awareness is steady, so there is only a Being but not a separation. 

As a behaviour of mind, it is always in a loop. So focusing on solving problems through a particular state of mind doesn't necessarily lead to a long term conclusion - doesn't lead to satisfaction. This is quite obvious, but one takes time to admit and accept it, so one decides to "leave" the "pending issue" and just be. That creates certain steadiness of observation and listening attentively. Slowly steadiness gets established. 

Can we allow ourselves the space to come to this awareness?

Hari Om.

Monday, September 08, 2025

श्री

श्री 

अनुभव असणार आहेत. म्हणजे स्पंदन ते स्थूल आकार असे साखळीचे वावरणे असणार अस्तित्वात, म्हणून आपण आणि जग हा अनुभव ध्यानात येत राहतो. त्या शक्तीच्या वापरण्याचा, कार्याचा परिणाम असतो मनावर - मन होणे आणि त्याची क्रिया चालू राहणे असेही सांगता येऊ शकते इथे. 

अस्तित्व म्हणजे शक्ती आणि शक्तीचे असणे म्हणजे कार्य करणे. Existence is Action. And Action is Becoming. 

कार्याचे मूळ काय असते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न आहे, म्हणजे परिवर्तनाची शक्यता आहे जीवाच्या शक्तित. परिवर्तन होऊ पाहणे म्हणजे स्थिरतेच्या अनुभवाच्या जवळ जात राहणे. परिवर्तन होण्यात अनेक विचार आणि भावना येऊ पाहतात, जे बरेच स्तर जाणिवेत आणतात आणि त्या स्तरातील साखळी आणि स्तराचे संबंध दर्शवतात. त्यातूनही शांती भाव संक्रांत करणे आहे. 

असा सर्व मार्ग आहे किंव्हा दिशा आहे अनुभवाची. 

हरि ओम.

Sunday, September 07, 2025

श्री

श्री 

आपण नुसते ऐकावे, उत्तरे किंव्हा कोडी सोडवू नये - तसा विचारही आणू नये. ऐकण्यात कुठलीही प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा नसते, हो ला हो किंव्हा नाही ला हो किंव्हा आणखीन काही. हाच नियम करण्यावर, सांगण्यावर, बघण्यात असावा. निरहेतू किंव्हा शुद्ध जाणिवेतून कार्य करणे. 

लोकं झटापटी खूप करताना दिसतात - some sort of desperation to set things right - आणि हे का होतं, त्याला मनाची स्थिती कारणीभूत आहे आणि इतिहास देखील. 

कोडी सोडवणे हे प्रगतिशी निगडित झालेलं गणित आहे/ समजूत केली गेली आहे. नवीन, नवीन कोडी दिसतीलच, जसे विभक्त आपण आणखीन होऊ! मग त्यास सोडवण्यास कोणते शहाणपण आले?! म्हणजे पहिले समस्या उभी करावी आणि मग सोडवण्याची धडपड करावी - snowball effect. एक क्षण असा आणायला लागतो की आपण स्वतःला म्हणतो की बास झाला हा वेडेपणा! ह्या चक्रात राहून आपले भले होणार आहे का?! आणि नाही होणार, तर मार्ग कुठला करावा? हा प्रश्न मूळचा आहे. 

माझी खात्री आहे की संगणकाच्या बिळात जाऊन शांती निष्पन्न होते, असे काही दिसून येतं नाही सध्या. उलट विचारांचे अधिक विघटन आणि हिंसा दिसून येते. शांत होण्याचा प्रवास जगाच्या प्रगतीच्या उलट दिशेने असावा. हे पूर्ण मान्य करावे आणि त्या प्रमाणे स्थळ आणि काळाकडे बघावे. 

आठवड्याच्या शेवटी किंवा कुठल्याही मोकळ्या वेळेस प्रचंड चिंता मला भेडसावून सोडायची...तब्येतीची, आई - वडिलांची, कामाची, सैय्यमाची, असंख्य कामाच्या साखळींची, विस्मृती होण्याची, पैशांची, प्रगतीची, संसाराची, आयुष्याची, बदलांची, घराची, कामाला येणाऱ्या मावशी मंडळींची, एकटेपणाची, 'कुठेही श्वास घ्यायला जागा नाही' ह्या भावनाची, त्रागाची, त्रासाची.... हे न संपणारे विचार चक्र वाटायचे. त्यातून बाहेर येणे म्हणजे काय, ह्याची सतत धडपड सुरू असायची आणि त्यातून आणखीनच त्रास, कष्ट, दमणूक.....

काही कालांतराने असे दिसून आले, की एवढे कष्टी आपण का होतो आणि असे करून काय मिळते? कठोर प्रश्न, मुळाचे प्रश्न विचारणे भाग पडते...कार्य, जबाबदारी, मर्यादा, सैय्यम, आपुलकी, तटस्थ, स्वतःचे असे काहीसे, फरफट, क्षमा, सिद्ध, वेग, प्रगती, नुसते बघणे, तिथेच असणे, पळून न जाणे, न्यूनपणा न वाटून घेणे, शांतीने करत राहणे....

असे आहे सर्व काही. इथून पुढे मार्ग स्पष्ट आहे, असा नाही. तस मी ठामपणे मांडत नाही आहे काही. 

आहे ते आहे. येणार ते येणार. आणि जाणार ते जाणार. 

हरि ओम.