श्री 

रूपाला _घट्ट_ धरणे कदाचित भगवंताची इच्छा असावी. ही प्रक्रिया गूढ असते आणि त्यात बरेच घटक आणि स्तर आणि साखळी आणि चक्र सामील असतात. हे सर्व प्रकट होणारे गोष्टी आहेत, त्यांना पाहुणे मानणे योग्य. म्हणजे ते येणार, वावरणार आणि निघून जाणार किंव्हा परिवर्तित होणार. This is a _phenomenon of becoming_.

हे विचार पचनी पडणे म्हणजे लोकांची प्रतिक्रिया कायम नसते...ते येतात आणि विलीन होतात. मनात तसे काही राहत नाही. म्हणून आपणही प्रतिक्रियांवर लक्ष केंद्रित करू नये. ह्याचा अर्थ वारंवार स्वतःला माफ करणे, परत प्रयत्न करणे, सकारात्मक राहणे, श्रद्धा वाढवणे, सैय्यम ठेवणे हे अभिप्रेत असते. 

प्रतिक्रिया ह्यावर निष्कर्ष त्वरीत आणू नये. निकाल लावणे हे काही आपले ध्येय नाही, आणि निकाल जरी लावला तरी त्यातून खरे समाधान सामावलेले असते का, ह्याचा विचार करावा. ह्याचा अर्थ की निष्कर्ष, जी बुद्धीची गरज असावी, त्यातून समाधान प्रकट होते असे काहीही नाही. तरीही पदोपदी निष्कर्ष, ही गोष्ट असणार आपल्या अनुभवात. तर ते होऊ द्यावे आणि परिणामांना सामोरे जावे. 

निकाल काय, परिणाम काय, प्रतिक्रिया काय, ह्यावरून आपण ठरत नसतो. 

दृश्याचा कुठल्याही हालचाली वरून आपण ठरत नसतो. "ठरणे" म्हणजे खूप साऱ्या चक्रातून निष्कर्षाला येणे. मग ते ठरणे ताबा मिळवणे असावे की हताश होणे की असमाधानी राहणे, त्याने काहीही ठरत नसते. ह्याचाच अर्थ की शांती, हेच आपले स्थान आहे. 

लोकं नेहमी शांतीच्या शोधात राहणार. भीती खूप गूढ पद्धतीने प्रकट होते, संबंध आणते आणि क्रिया करायला भाग पाडते. त्यात आपण पैसा, नातीगोती, काम, हेतू, सतत गुंतवून ठेवणे असे निरनिराळे आपल्या भोवती कवच घालून ठेवतो. कवच एका दृष्टीने फसवे आहेत आणि दुसऱ्या दृष्टीने प्रमाण. 

स्वस्थ आपल्याला अजिबात बसवत नाही! ते का, हे ठाऊक नाही, म्हणून सर्व स्तर, साखळी, भाव आपल्या बरोबर असतात. 

ह्याचा पर्याय म्हणा, किंव्हा ओळख म्हणा....शांती भाव प्रस्थापित करणे आले.

हरि ओम.


Shree 

Space is to be shared to all kinds of imagination. The idea of separation or individuality is not tenable and causes deep fracture. This means that _awareness_ needs a comprehensive understanding of existence, not a speck of it.

Architecture can be considered, among other things, as an action of awareness. Hence all thoughts, processes, built forms respond to this function of awareness. 

All spaces therefore can be comprehensively conceived. And that perhaps also becomes the critical dimension of architecture....what are the architecture's intentions? 

Awareness is an idea of discovery of connections. The issue with the mind is that it latches onto a concept and normalizes it. If we see individuality as a problem, but some years of engagement with this idea can normalize the phenomenon. No one looks at individualism with scorn or skepticism, but normalizes it as if it is a natural phenomenon of a modern mindscape. 

And so is with a human life. Anything can be seen as critical or something that is considered absolutely normal. It is upto the mind. 

In this awareness, the search is for the Truth which is beyond any human choice. 

Hari Om.