Wednesday, December 31, 2025

श्री

श्री 

विचारान बद्दल काही गोष्टी लक्षात येतात...

सर्व प्रकारच्या विचारातून "मी" हा भाव कायम असतो, प्रज्वलित राहतो किंव्हा लपून बसला असतो. आपण कुठेही गेलो, काहीही केलं, कुठलीही परिस्थिती येऊ घातली, तरी हा भाव असतो. त्याला धरून ठेवले असते आपण. म्हणून शांत होण्यासाठी, ह्या भावाला विलीन व्हावे लागते, म्हणजेच भगवंताचे स्थान ओळखायला लागते आणि त्याच्याशी एकरस साधायला लागतो. 

माझ्या स्मरणेपेक्षा भगवंत जास्ती सूक्ष्म असतो, कारण मुळात माझा उगम त्याच्या कार्यातून झाला असतो. म्हणून माझा प्रवाह, परिस्थिती, काल, आज, उद्या, प्रवास, अनुभव, बदल, संबंध, परिणाम - सर्व त्याच्या इच्छेने होत राहतात. त्यांना स्वीकारणे.

स्वीकारणे म्हणजे कार्य करत राहावे आणि स्थिर व्हावे. त्यात प्रश्न येतील, विचार येतील, नाईलाज अशी परिस्थिती सामोरे येईल, बदल होतील, देहाच्या हालचाली होत राहतील, आपण इकडे तिकडे आपटत राहू - जे काही होत राहील, ते शांतीने स्वीकारावे.

म्हणजेच भगवंताशी संवाद साधणे. दृश्यात जरी असलो आणि त्यात जरी क्रिया झाल्या, तरी शांती त्यातून आत्मसात करावी. 

जीव होणे हे विधिलिखित आहे अस्तित्वाच्या अखंड प्रवासात. म्हणून त्यातील अनुभवाचे स्वरूप, दिशा, परिणाम, मार्ग आणि शांती भाव पर्यंतचा प्रवास देखील आत्मसात होणार. म्हणजेच श्रद्धा स्थित करायला लागणार आणि ती होणार. 

सुख किंव्हा दुख हे आतील भावामुळे ठरतं, नाहीतर त्या परिस्थितीत तसे काहीही नसतं. एखादी गोष्ट नाजूक का वाटते, काळी का असते, बेचैन का करते किंव्हा छोटी का दिसते किंव्हा मोठ्यांनी का आवाज करते, हे आपल्यावर निर्भर आहे. त्या गोष्टीतील हेतू शोधणे म्हणजे स्वतः त्रासिक होणे, कारण हेतू कधीच समाधान भाव देत नसतो. म्हणून हेतू शोधून तोडगा काढण्याचा अट्टाहास शिथिल करावे. 

सर्व योग्यच होत. आपली श्रद्धा पाहिजे बळवंत होण्यावर. होण्यानी, बदलांनी, हालचालींनी, संबंधांनी स्वतःचे सिद्धपण ठरत नाही. आपण कशावरही अवलंबून नसतो. हे सत्य ओळखावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home