Sunday, April 05, 2026

श्री

 श्री 


मन, ही गोष्ट, काहीही निर्माण करू शकते आणि कशातही गुंतून राहू शकते. ह्याचा अर्थ हा, की मनाचा संबंध अस्तित्व शक्तीशी कायम स्थित असते. म्हणून त्या शक्तीचा परिणाम अर्थातच मनात स्थित राहणार. 

सांगण्याचे तात्पर्य हे, की खूप गूढ स्थितीतून विचारांचे निर्मिती ठरते आणि त्यात बऱ्याच भावना देखील निर्माण होत राहतात. ह्या प्रक्रियेत जीवाचे स्मरण कुठेतरी एक _भाव_ निर्माण होतो आणि त्यामुळे तो भाव चक्रात गुंतवून ठेवतो. त्या भावामुळे सर्व काही दिसते, अनुभवात येते, परिणाम भोगला जातो आणि नाना प्रकारच्या गोष्टीना _सामोरे जाणे भाग पडते_. 

काय करावे ह्या प्रक्रियेला?!! हा सवाल आहे आपल्यासाठी. ह्याला काही उत्तर आहे का? _मार्ग_ असतो.  त्या मार्गावर गेल्याने शांती भावात मन परिवर्तित होते. 

वेळ कसे घालवावे, फुकट घालवण्याची संकल्पना, जबाबदाऱ्या, खंत, राग, उतावळेपण, निवांतपणा, तोच तोच विचार परत आठवणे - ह्यात सर्व काही अभिप्रेत आहे. काही विचार खूप कठीण ठरतात पचवायला आणि ते पचवण्यासाठी कधी कधी परत परत तो विचार ध्यानात येऊन पचायला लागतो....रवंथ केल्या सारखे. असे म्हणतात की गायला ४ पोट तरी असतात रवंथ करायला. मनाला कितीतरी पोटे असतील असंख्य वेळा रवंथ करायला! म्हणजे आत जाऊन, बाहेर आणणे आणि परत आत नेणे, हे आपले मन करेल आणि ते त्याला करू द्यावे.  त्याचा परिणाम प्रत्येक जीवात वेग वेगळा होतो. ते ही होऊ द्यावे. त्यातून शांतीचा मार्ग स्थित असतो.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home