श्री
श्री
आपले विचार, आपले रूप, आपली भावना शांत, सूक्ष्म आणि स्वावलंबित करावी. म्हणजे स्थळ आणि काळाशी त्याचे संबंध शांतीचे होऊ द्यावे. शांती हा एकमेव संबंध, एकमेव कार्य, एकमेव स्मरण, एकमेव अनुभव, एकमेव अस्तित्व *स्थित* व्हायला हवे. त्याला "स्वतः सिद्ध" अशीही उपमा दिलेली आहे.
स्थिर होण्याचा प्रवासात, अगोदरच्या टप्प्यांना स्वीकारावे लागते. टप्प्यांची सुरुवात दृश्यातून होते आणि एक, एक करत ६ सूक्ष्म स्थितींचे अनुभव (संबंध) आत्मसात करावे लागतात. ह्या मार्गावर जाण्याचा किंव्हा आत्मसात करण्याचा निश्चय व्हावा लागतो.
शांती स्थित होण्याच्या मार्गावर, दृश्याला निर्विश करणे असते. म्हणजे प्रवाह, हालचाली, बदल, संबंधांचे रूप येऊ द्यावे आणि जाऊ द्यावे आणि हे सर्व हेतू न राखता त्याकडे नुसते शांतीने बघावे. प्रवाह येत राहणार आहे प्रत्येक क्षणी, हे ओळखावे आणि स्वीकारावे. मग मी कुठेही गेलो किंव्हा एकेठिकाणी असलो, प्रवाह येत राहणार आहे. म्हणजे कुठलाही क्षण स्थिर नसतो आणि तो एका साखळीचा किंव्हा चक्राचा घटक असतो. जो काही क्षण असतो, त्याचे लागेबांधे इतर असंख्य गोष्टींशी, स्तरांशी जुळलेले असतात, जे पूर्णपणे बुद्धीच्या ध्यानीही येत नाही. म्हणून एकंदरीत भगवंताच्या अस्तित्वामुळे क्षणाची निर्मिती होत असते. क्षणाची निर्मिती म्हणजे प्रवाहाची निर्मिती, संबंधांची निर्मिती, माझी निर्मिती...
ह्या सर्व घडामोडी मध्ये भगवंताचे अनुसंधान टिकवणे महत्त्वाचे ठरते.
हरि ओम.
श्री
आजच्या जमान्यात क्षण स्थिर करावा, अशी अपेक्षा फोल ठरू शकते. ह्याचा अर्थ स्वार्थी हेतू किंव्हा अपेक्षातून किंव्हा अट्टाहासातून क्षणाचा अर्थ लावणे स्वतःला कष्टी करू शकते.
जे होत असते, ते होऊ द्यावे. कशालाही अडवू नये. ह्याचा दुसरा अर्थ हा की सर्व भगवंताच्या इच्छेने गोष्टी स्थित होतात, हे ध्यानात आणावे आणि स्वीकारावे. असे केल्याने शांती भाव कायम आपल्या बरोबर स्थित राहतो. ह्याचा तिसरा अर्थ हा, की आपण सूक्ष्म स्थितीत पदार्पण करतो, शांत होतो, पलीकडे होतो, श्रद्धा वाढवतो, अंतर्मुख होतो.
ह्याचा एक मार्ग म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.
श्री
शुद्ध, स्वतःसाठी कर्तव्य करावे, आणि त्यातून देण्याची व्याख्या संपादन करणे ह्यातून शांती निश्चित मिळू शकेल. मी, तू, ही संकल्पना आहे. संबंध कार्य आहे. दृश्य काल्पनिक आहे. सत्य जे असते, ते आत्मसात करावे. मुख्यतः *सत्य*, असे काहीतरी असणार आहे आणि त्याचा संबंध आपल्या जीवनाच्या हालचालीत येत राहणार आहे, हे जीव ओळखू शकतो. तिथून निश्चय होतो. शोधातूनच आणि परिणामांच्या प्रकारातून ह्या निश्चय पर्यंत आपण पोहोचतो. पुढे मार्ग असतोच. तिथेही निश्चय पदोपदी लागतो.
सत्याचा स्वतःमध्ये परिणाम विलक्षण असतो. परिणाम दाखवण्याची किंवा सांगण्याची जरुरी नसते. परिणाम कुणावर अवलंबून राहण्याचीही गरज नसते. योग्य परिवर्तन होतेच. आणि शुद्ध होणे, ही शक्ती आहे, जी दृश्याशी आसक्ती बाळगत नाही किंव्हा दृश्याचा विपरीत परिणाम करून घेत नाही. त्यासाठी सतत भगवंताचे स्मरण प्रज्वलित ठेवत राहायला लागते. तेच स्मरण आत परिवर्तन आणते.

0 Comments:
Post a Comment
<< Home