Wednesday, April 01, 2026

श्री

श्री 

अस्तित्व, ही स्थित गोष्ट आहे. तिच्यापासून होणाऱ्या गोष्टी, कार्य, रूप, आकार, प्रवाह हे स्थित असतात. भगवंताची _इच्छा_ म्हणून हे सर्व विश्व, त्यातील घडामोडी, त्यातील अनंत जीव जे संबंधित असतात, येतात आणि निघून जातात. 

भगवंताची इच्छा अनुभवात आणायला लागते. म्हणजेच आपण सूक्ष्म होणे आणि विलीन होणे येते. त्यावरून शांती भाव प्रस्थापित होते. 

आपण कुठला भाव प्रज्वलित ठेवतो, हा प्रश्न आहे. तो भाव सूक्ष्म स्तरातून येत असतो, म्हणून तो गूढ असतो किंवा त्याला भगवत इच्छा संबोधले गेले असते. भावाचा उगम, कार्य, संबंध हे गूढ आहे. गूढ म्हणजे ह्याला फक्त शुद्ध, निःस्वार्थी हेतू असतो. म्हणून एकातून अनेक अश्या गोष्टी घडत राहतात. 

ह्याचे आकलन होण्यासाठी नामस्मरण करावे.

हरि ओम.


श्री 

संबंध काही वाईट नसतात. त्यांना टप्पा म्हणून, कर्तव्य करत शांत होणे, हा मार्ग समजावा आपला. सत्यात जरी "मी" सर्व गोष्टींच्या पलीकडे असलो आणि त्यातून सर्व काही होत असलं, तरीही "माझ्या निर्माण झालेल्या संबंधातून" शांतीकडे वाटचाल करायला लागते. म्हणजे संबंध स्वीकारावे लागतात, स्थिती स्वीकारावी लागते, परावलंबित स्थिती आत्मसात करावी लागते, आपले देणे असते जे द्यायला लागते, भोग स्वीकारावे लागतात, दर्शन बघायला लागते, अनुभव स्वीकारावे लागतात, त्यातील सारे घटक विषय, शंका, प्रश्न स्वीकारावे लागतात, आणि कार्य करत राहायला लागतं.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home