Monday, March 23, 2026

श्री

 श्री 


प्रत्येक वासनेवर, विचारावर, भावनेवर प्रतिक्रिया दिली हवी किंव्हा त्याचे परिवर्तन व्यवहारात करायला हवे, असे काहीही नाही. तशी अपेक्षा जीव ठेवत राहतो, म्हणून दृश्याशी गुंतून राहणे, असे होते आणि परिणाम भोगला जातो. 

वासना, विचार, भावना हे सारे संबंध असतात दृश्याशी. त्यातून रूप आणि आकार घडते आणि त्या परिस्थितीशी संबंध जोडते. त्याला द्वैत किंव्हा अनुभव म्हणता येईल. इथे मनोरचनेची दृष्टी अहं वृत्तीची असते. 

ती दृष्टी शांत होणे अभिप्रेत आहे, म्हणजे भगवंताची जाणीव मनात प्रखर होणे, स्थित होणे, मन स्थिर होणे, सूक्ष्म होणे वगैरे. त्यामुळे वासनेचा, विचारांचा आणि भावनांचा स्वतःवर विपरीत किंव्हा स्वार्थी किंव्हा मर्यादित प्रभाव राहत नाही. त्याचा प्रभाव क्षीण झाला, तर त्यांच्या मुळे येऊ घातलेले सर्व संबंध - दृश्याशी - त्याचा ही प्रभाव मावळेल. म्हणजे आसक्ती कमी होते. ह्या सर्व क्रियेला "अंतर्मुख होणे" असे सांगितले आहे. 

There is also a transcendental space and time. In this concept or reality then, space and time aren't separated from the experience of self. There would also be an inquiry on if space comes first or self. But why _search_ for the first?! Searching for "first" brings up a cycle of things that eventually also dilute. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home