Sunday, May 31, 2026

श्री

 श्री 


काही लोकांचे प्रश्न, माझ्या मते, गहन होतात आणि ते फक्त ऐकावे लागतात समोरच्याने. ते प्रश्न मांडता येतात त्या लोकांना असे नाही, पण त्याचा परिणाम त्यांच्या जाणिवेत खूप खोलवर झालेला दिसतो आणि त्या पद्धतीने व्यवहार ते इतरांन बरोबर करायला घेतात. 

प्रश्न मुळात विचारण्यासाठी नसावेत आणि त्यावरून इतरांनी सांत्वन करावे, ही अपेक्षा देखील कितपत योग्य आहे, हे बघावे. प्रश्न स्वतःला पडलेला असतो, अस्तित्वाचा, कार्याचा, संबंधाचा, परावलंबनाचा, भावनेचा, मर्यादेचा वगैरे. परिस्थिती प्रश्न सोडवते का? की काही त्यासाठी वेगळे प्रयास लागतात? हा असावा _शोध_. शोध हाती घेणे, हा स्वाभाविक गुण आहे जीवाचा आणि तसा तो केल्याशिवाय काही चैन पडत नसावे कुणालाही. पण त्यासाठी व्याकुळ व्हावे का? हा परत ज्याचा त्याचा प्रश्न आहे...तसे ठाम उत्तर त्या प्रश्नाला कदाचित नसावे. 

मानवी समाजामध्ये असे वयोमानाचे लोकं संपर्कात येतात - जसे की लहान मुले किंव्हा वृद्ध व्यक्ती - ज्यांचे म्हणणे फक्त ऐकून घ्यायला लागते. प्रश्न खूप विकट असावेत त्यांचे आणि काहीही केल्या त्यांचे उत्तरे कुठल्याही दृश्याच्या भाषेत/ व्यवहारात/ संबंधात सापडत नाही. त्यामुळे वृद्ध लोकांची व्याकुळता कायम राहण्याची शक्यता खूप वाढू शकते. लहान मुले काय की वृद्ध लोकं काय, त्यांना वेळ, स्थळ, नाती असल्या बंधनाशी विशेष व्यवहार अवलंबून करण्यात रस नसतो. त्यामुळे त्यांचा संवाद खूप निराळा होतो, विचार वेगळे असतात, भावना वेगळ्या असतात. 

काम करणाऱ्या मंडळींना हे पचनी पाडायला लागते. संवाद जर - तर ह्या भाषेतील नसते, धडपडीचे नसते, काहीतरी कोडे सुटण्याची अपेक्षा नसते, वेळेचा आभास असतो अशी जाणीव शिथिल झालेली असावी, कधी कधी त्यांच्याच पूर्वीच्या स्मरणात मन रममाण होत राहते, अट्टाहास कोडी सोडवण्याचा रहात नसावे, वगैरे.

एका बौद्धिक अर्थाने, वरील जाणीव खूप निराळी ठरते दररोजच्या व्यवहाराच्या तुलनेने. पण मानवी जाणीव आणि सत्याच्या पार्श्वभूमीवर, ह्या लोकांना समजून घेणे आणि स्वीकारणे शक्य होऊ शकते. 

खरे पाहिले तर आपले स्वतःचे अनुभव देखील ह्या सर्व रूपातून जात असतात/ जाणार असतात. कधीतरी आपण लहान असतो आणि प्रेमाशिवाय दुसरी कुठलीच भाषा त्यावेळी ध्यानात आलेली नसते. वृद्ध लोकांसाठी कदाचित सत्य आणखीन प्रखरतेने जाणवल्यामुळे त्यांचे मन कदाचित आणखीन मोकळे झालेले असते. काम करणाऱ्या लोकांना जरा व्यवहारात गुंतायला लागत असावे मात्र. 

पण प्रश्न असा उद्भवतो, की व्यवहारात गुंतताना स्वतःला इतके स्वार्थी का करावे आणि इतके कसे परावलंबी करावे, की कुणाचीही पर्वा असू नये?! मग ह्याला _प्रगती_ कुठल्या अंगाने म्हणावी?!! 

काही लोकांचे म्हणणे असे असते की हा नैसर्गिक क्रम आहे, तर स्वार्थीपणा कधी ना कधीतरी येणार प्रत्येकाला. मला माहित नाही ह्या बद्दल विचार करताना....म्हणजे स्वार्थी होणे, हे कदाचित तिथे मन खेचले जाऊ शकेल, पण मनुष्य मग कशाला म्हणायचे? की कुठल्याही प्रसंगी, शिस्त लावून, शांतीचे ध्यान करत व्यवहारात गुंतत राहावे.  आणि असा नक्कीच निश्चय करायला लागतो आणि तिथेच बुद्धीची कस लागते. There is going to be a struggle.

आता अजून एक मुद्दा असा की प्रश्न जर स्वतःचा शोध आहे, तर तो इतरांनी सोडवायला हवा का किंव्हा इतरांची त्यामागची भूमिका काय ठरते? तर उत्तर असे सुचविले आहे की इतर जण "निमित्त" ठरतात प्रश्न सोडवण्यासाठी. प्रश्नाचे उत्तरे इतरांनी द्यावे हे काही बंधनकारक नाही, कितीही स्वतःला वाटलं तरीही. प्रश्न खूप गूढ असतो आणि त्याचे उत्तर ज्याने त्यानेच आत्मसात करायचे असते/ करावे लागते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home