Friday, August 14, 2026

श्री

  श्री 

 आयुष्यात ध्यानी धीमेपणा आणायला लागतो. हालचाली कसे होतीलकिती वेगात घडतीलसंबंध कसे होतील - ह्याची चिंता न होऊ द्यावी....म्हणजे शांती आणि धीमेपण संक्रांत झाले असे समजावे. म्हणून काहीही झाले तरी व्याकुळ न व्हावे...कुणास ठाऊकती भगवत इच्छाच असावी! धीमेपणा जसा वाढतोतशी भगवंताची इच्छा जाणिवेत ओळखली जाऊ शकते. 

 दुसऱ्या पद्धतीने अहं भाव विलीन झाला की धीमेपणा येतोशांत व्हायला होते. म्हणून आपण आपले कर्तव्य करत राहावे आणि भगवंताचे चिंतनस्मरण सुरू ठेवावे.

 हरि ओम.

 

श्री 

 जेवढा संबंध बौद्धिक पातळीवर जोडण्याचा प्रयत्न करतोतितके दृश्याचे संस्कारस्वभावस्थूलपणा बुद्धी घेते किंव्हा आपण घेतो. _संबंध का आणि कसे जोडले जातातहा गूढ प्रकार आहेम्हणजे दैवी कार्यातून प्रकट झालेला आहेम्हणून त्याला घाबरून नाही चालणार. 

 बुद्धीचे तरी एक वेळ ठीक म्हणालोतरी वासना त्याही पेक्षा सूक्ष्म असल्यामुळेतिचे परिणाम कसे उमटत राहतात हे कळणे खूप अवघड असते. 

 प्रकार असा आहे की भयचिंतात्रासकष्ट - ह्या भावनांचे बीज कुठे असते आणि कसे निर्माण होते आणि काहे पूर्ण विलीन झाल्याशिवाय ओळखणे किंव्हा जाणणे कठीण असते. जाणीवही शक्तीभगवत स्वरूप बनवू शकते. तिच्यावर सर्व भार टाकून स्वस्थ चित्ताने संसार करत रहावा. 

 आयुष्याचा पाया जाणीव शक्ती आहेबुद्धी नाही. म्हणून जाणिवेला स्थळकाळ ह्याचे बंधने विशेष लागू पडत नाही आणि त्यातून धीमेपणेचा प्रभाव आणि श्रद्धाह्या दोन्ही गोष्टींचा योग्य परिणाम पचनी होतो.

 हरि ओम.

  

श्री 

 सिद्ध होण्यासाठी संबंध जोडले जातात किंव्हा घटकांशी व्यवहार होतो आणि परिणाम होतो. हा भाव असण्याचा परिणाम म्हणावा. असे का असतेहे मान्य करावे की "माहीत नाही"आणि त्यात स्वच्छ मनाने बघत रहावे...म्हणजे न्यूनपणा वाटणार नाही. 

 जेव्हा अशी भावना आपण घेतोतेव्हा पलीकडे होण्याची परवानगी आपण निर्माण करतो. 

 In other words it is completely accepting vulnerability of the human condition.

 हरि ओम.

 

 श्री 

 एकंदरीत काही विचार मांडायचे होते -

 संबंधांचे मूळ कळणे कठीण बुद्धीने. ज्या पद्धतीने अस्तित्वात स्तर असतात आणि त्यांचे _कार्यअसतेत्यातून अहं भाव आणि दुःखाची निर्मिती होत राहते आणि त्यात गुंतायला होते. अर्थात हे अनुभव भगवत इच्छेने येतातअसे ओळखलेकी मन शांत होतेनाहीतर विषयांना धरून दुख निर्माण करते आणि कष्टी होते. कुठे मन गुंतून राहतेहे ओळखावे आणि त्या प्रमाणे आसक्ती विलीन होऊ द्यावी. हा प्रवास असतो. त्यावर श्रद्धा ठेवून असा विचार आणावाकी आज ना उद्या शांती भाव संक्रांत होईलकारण "आपला" मूळ स्वभाव शांत होण्याचा आहेम्हणजे विलीन होऊ देण्याचा. 

 प्रवाह आणि हालचालींवर स्वतःची व्याख्या किंव्हा दृश्याचा अर्थ ठेवण्याची घाई करू नये. प्रवाह भगवंत देतोम्हणून त्यावर मर्यादित हेतू असण्याचे कारण नाही. अस्तित्वाचा परिणाम खूप खोलवर असतो आणि तो कुठल्याही रूपाच्या किंवा हालचालींच्या पलीकडून सुरू होतो. म्हणून रूप किंव्हा आकार "दिसले नाही"तरीही सूक्ष्म पद्धतीने _परिणामअस्तित्वात वावरत असतो. म्हणून गोष्ट नाहीशी झाली तरीही ती "संपत नाही"कारण परिणाम वावरत असतेच आणि ती कारण ठरते वेगळी गोष्ट ध्यानात आणण्यासाठी. ह्याचा दुसरा अर्थ असाकी परिणाम आणि गोष्ट ह्यांच्यातील संबंध सरळ नसतातपण गूढ असतात. गोष्टींवरून बुद्धीने परिणाम शोधणे अवघड...त्यासाठी सूक्ष्म व्हायला लागते. 

 बाहेरील रूपातून आतील स्थिती कळणे अवघड. म्हणून कुणी बडबड्या असला कायकिंव्हा खूप काम केले काय का गप्प असला कायत्यातून त्याचे अंतर्मुख मन ओळखणे कठीण असते. म्हणून बाहेरील रूपातून काहीही निष्कर्ष काढण्याची गरज नाही आणि व्याकुळ होण्याचीही नाही. आपण शुद्ध व्हावेमग त्या मानाने सर्व जग शुद्ध जाणवते. 

 हरि ओम.

  

श्री 

 मानवी _भावअजब आहे किंव्हा त्याच्याशी आसक्ती ठेवणे. त्यात आपण खूप व्याकुळ होतोखूप दुःख निर्माण करत राहतोखूप गुंतून राहतोखूप चक्रात वावरतोखूप अपेक्षा ठेवतोखूप शंका आणि भीती बाळगतो...

 काय करावे आणि स्वस्थ होऊ द्यावे अनुभवांना?....काहीही जरी केले तरी त्यात मनाची वळवळ काही थांबत नाही! ती भगवंताला शरण जाऊन शांत होतेअसे सुचविणे आहे. आयुष्यातील समाधान म्हणजे गोळा बेरीज नाही की वजा बाकी नाही...म्हणजे ती कुठल्याही मनाच्या तर्कावर अवलंबून असत नाही. म्हणून मनाच्या स्वभावाला विशेष मानून घेऊ नये.

 हरि ओम.

 

Shree 

 Time and space are _in_ imagination. There is also Existence where time and space are in a _form_ which is not recognisable from any phenomenon based logic. Therefore, time and space, as we know it, have _arrived from_ Existence. 

 थोडक्यात वेळ आणि स्थळ ही स्तर दर्शवते आणि ती काही सर्वस्वी मानू नये स्वतःची व्याख्या ठरवण्यासाठी. त्याचे काही बंधने असतीलजे भगवंताने दिले आहेत. ते संपूर्ण स्वीकारावे आणि शांत रहावे.

 हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home