Friday, August 07, 2026

श्री

श्री 

निसर्ग, पर्यावरण, अर्थ, संबंध, स्मरण, स्थळ, काळ, कार्य, हेतू, अस्तित्व - ह्या सर्व संकल्पना शांतीचे अर्थ अनुभवात आणू शकतात. तो नैसर्गिक जीवाचा प्रवास असतो, म्हणून त्या अर्थाने शोध होतो, मार्ग गवसतो आणि शेवटी स्थिर होते मन. 

आपण दृश्यात देवाच्या इच्छेने, त्याला हवे म्हणून इथे "होतो", आणि त्याच्याशी परत एकरस व्हावे, म्हणून परत _शोध_, ही गोष्ट, ध्यानात येते. 

देवाला भेटावे, पूर्ण व्हावे, शांत व्हावे, म्हणून सर्व खटपट आपण करतो. शोधेचे स्पष्टीकरण देण्याची खरी गरज नसते कुणालाही आणि कदाचित त्या गूढ अर्थाने सारे घडामोडी होत असावेत - आत आणि बाहेर. स्पष्टीकरण, ही गोष्ट, परावलंबित झाल्यामुळे होते. जिथे भाव वेगळा किंव्हा दुसरा नाही, तिथे स्पष्टीकरणेची गरज उरेल का? 

म्हणून स्पष्टीकरणेतही खूप इतर गोष्टी सूचित होतात. दृश्य काय, वावर काय, प्रतिक्रिया काय, स्मरण काय, अर्थ काय - काहीही दोष मानू नये. सर्व अनुभव पलीकडून आलेले असते, म्हणून ते चक्र स्वीकारावे शांतीने. वेग असा का होतो, असे रूप का असते वगैरे, स्वतःच्या समाधानासाठी प्रश्न विचारायला हरकत नाही, पण दृश्य बदलावे अशी अपेक्षा ठेवू नये.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home