श्री
श्री
अस्तित्व हे सत्य आहे स्वतःसाठी. त्यात खूप सारे स्तर, हालचाली, शक्ती प्रभाव घालत मन होते, अहं भाव होतो आणि अनुभवाचे चक्र सुरू राहते. हे होणार. त्यातून स्थळ आणि काळ आणि बदल किंव्हा कार्य दिसून येते. Phenomenon.
म्हणजे अस्तित्वाला रूप, आकार आणि सूक्ष्म असे अंग असते. सूक्ष्म अंग स्वतः सिद्ध आणि स्वतंत्र आणि खूप शांत असते, इतर सर्व स्थितीत बदल होत राहतो आणि तात्पुरतेपण असते.
दररोज ध्यानात वरील कार्य संपादन होत राहते, ते कुणीही अडवू शकत नाही, कारण तीच भगवत इच्छा असते. ह्याचा जो परिणाम होतो मनावर, वरील सत्य आत्मसात न झाल्यामुळे, त्याने _भीती ही भावना_ तैय्यार केली जाते आणि तीच खरी मानली जाते, त्यात आसक्ती निर्माण होते आणि खूप गुंतायला होते, खूप सिद्ध होण्याचा आटापिटा केला जातो.
गोष्टी होणे, असणे, गतिमान राहणे, हा अस्तित्वात असण्याचा भाग आहे आणि तो पूर्णपणे स्वीकारावा लागतो. हा अभ्यास आहे मनाचा.
म्हणून अशा अस्तित्वाच्या परिस्थितीत राहताना, जीवाला भगवंताच्या कार्याचा आधार लागतो आणि जाणीव तशी व्हायला लागते.
त्यासाठी प्रत्येक क्षणाला नामस्मरण करत राहायला लागते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home