श्री
श्री
शोध म्हणजे एका अर्थी श्रद्धा वाढवणे सगळ्या हालचालीत आणि प्रवाहात. प्रवास कुठे नेईल, आणि प्रवाह कसा असेल, ह्यावर आसक्ती न धरणे आणि शांतीने सर्वांना सामोरे जात राहणे. प्रवाह किंव्हा अनुभवामुळे प्रवास जाणवतो - स्थळ, काळ, क्रिया, संबंधांचा. ह्याचा अर्थ की सर्व मनावर असते. तोच प्रवास सूक्ष्माचा होऊ शकतो आणि विशाल स्थितीचे दर्शन देऊ शकतो. तसे झाले तर समजावे की देवाची कृपा जीवावर/ आपल्यावर झाली.
ह्याचा अर्थ की शोध सर्वांगीण होत असतो किंव्हा शोध हा विधिलिखित जीवाच्या शक्तीचा गुण धर्म म्हणावा. तो गूढ असतो आणि पलीकडे नेण्याचा मार्गही दाखवू शकतो. त्यावर श्रद्धा ठेवून स्थिरतेच्या प्रवासाला तो पदार्पण करून देतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home