Tuesday, August 11, 2026

श्री

श्री 

रूप, आकार, स्मरण, क्रिया, हालचाली, जाणीव - हे घटक असणार आहेत ध्यानात. ते सगळ्या किंव्हा कोणत्याही परिस्थितीत असणार आहेत, म्हणून त्यांचा _स्वभाव आणि परिणाम_ ध्यानात घ्यायला लागणार आहे. हे दोन्ही शब्द खूप गूढ आहेत, कारण त्यात कार्य, गुण, साखळी, स्मरण, व्यवहार, संबंध (इतर स्तरांशी आणि त्या स्तराशी) - ह्या सर्व गोष्टी सामील आहेत. 

अस्तित्व शेवटी काय असते? स्थळ आणि काळाची _जाणीव_ कुठल्याही स्तरात. जाणिवेत सगळ काही येते - मी, दृश्य, संबंध, कल्पना, बदल, परिणाम, भोग....

म्हणून जीवनात किंव्हा त्या परिस्थितीत सत्याची जाणीव स्वतःला (मनाला) करून घ्यायला लागते. सत्याला कुठल्याही परिस्थितीत जाणता येतं, कारण परिस्थितीच्या पलीकडे तिचे अस्तित्व असते. सर्व स्तर विलीन झाल्यावर, तरीही जे असते, त्याला सत्य म्हणतात. 

आपण तैय्यार आहोत का ते जाणून घ्यायला?

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home