Wednesday, August 19, 2026

श्री

 श्री 


स्वतःच्या मनोरचनेमुळे स्मरणात येणाऱ्या गोष्टी प्रकट होत राहतात आणि त्यांना धरले जाते. ह्याला तसे वेगळे प्रयत्न लागत नाही आणि हाच झाला अस्तित्वाचा स्वभाव किंव्हा जाणिवेचे कार्य. एखादी गोष्ट का आठवते आणि दुसरी का ध्यानात येत नाही...त्यात खूप गूढ अर्थ भरला असतो. 

असो, तरीही त्यातून स्वतःला किंव्हा इतरांना लेखण्याची गरज नसते. _Memory_ isn't the basis of evaluating or ridiculing anybody. ज्याला स्मरण म्हणतो, ते तरी स्वतःचे कुठे असते?! ते अस्तित्व कार्यातून येत राहते. 

म्हणून नाम घेत रहावे. त्यातून जे स्मरण होईल, ते धरले जाईल ओघाने. वाईट विचारांचे स्मरण होण्यापेक्षा, योग्य विचारांचे स्मरण संक्रांत झाले, तर ते केव्हाही बरे....कारण स्मरण स्वतःशी मर्यादित न राहता, ते चारही दिशांशी संबंध जोडते. म्हणून जर स्वतःत परिवर्तन झाले, तर दृश्यात परिवर्तन होते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home