Shree
Shree
We are completely hopeless to achieve any control over things! This is not a pessimistic inference, but a fundamental truth of the way things are. No matter what we do, how we do, how we analyse...there is a gap in reality and the situation. विघटित वाटणे, अशा काहीश्या परिस्थितीत आपण असतो. मग त्यातून काहीही केले, तर त्यातून स्थिरता किंवा समाधान कसे मिळेल?!!
विचारांची जी दिशा असते, ती विघटित किंव्हा बहिर्मुख, चक्रात गुंतवून ठेवणारी असते. मुळात विचार ह्याच कारणामुळे संक्रांत होत असतात किंव्हा प्रकट होत असतात ध्यानात. त्या प्रकट होण्याच्या कार्याला गुंतायला होते, अहं भाव चढतो, स्मरण बदलते आणि "मी" असा अर्थ निर्माण होतो.
म्हणून सर्व भगवंताकडून येत असते, तो योग्यच करतो, तो काळजी घेतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवणे - अशा गोष्टी ध्यानात आणायला लागतात.
म्हणून विचारांना त्या दृष्टीने खूप महत्व आहे, कारण त्यातून परिवर्तन होण्याची शक्यता स्थित होते. त्यात काही गोष्टी बघाव्या -
प्रत्येक येऊ घातलेल्या विचाराचा प्रवास असतो, जो पूर्णपणे स्वीकारावा लागतो. त्यात सर्व काही येते - संकोच, दुःख, धावपळ, न्यूनपणा, उत्तेजीत असणे, सिद्धत्व, शिथिल होणे, वगैरे. जसे आहे, तसे मान्य करावे. त्यातूनच विचार शिथिल होतात, आपुलकी वाढते आणि शांती वाढते.
जे योग्य वाटते, ते करावे आणि भगवंताचे नाम घ्यावे. तो उचित फळ देतोच, ह्यावर श्रद्धा ठेवावे.
कल्पनावर भर द्यावे. दृश्यात घडणाऱ्या गोष्टींच्या स्वभावाला काहीही करू शकत नाही आपण आणि त्याने आपण मुळीच ठरत नाही. पण गूढ आणि योग्य कल्पना जोपासायला घ्यावे, कारण त्यातून आतून परिवर्तन होण्याची शक्यता निश्चित असते.
एकंदरीत शांत रहावे वावरत राहताना आणि कर्तव्य करावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home