श्री
श्री
भगवंताला स्वतःच्या जीवनात, प्रपंचात, संबंधात आणायला लागते...म्हणजे प्रत्येकाचा मार्ग स्वतःला गवसायला लागतो.
सैय्यम, श्रद्धा, प्रयत्न, धीमेपणा हे _मुल्य_ स्वतःच्या जीवनात लावायचे असतात. एका अर्थी _मुल्य_ स्थळ आणि काळाच्या पलीकडे असतात आणि ते एक विशिष्ठ रूपातून अनुभवात येऊ द्यावे लागतात. त्या मूल्यांना आत्मसात होण्यासाठी मार्ग पत्करणे येते....जसे की नामस्मरण.
माणूस मूल्यांना विसरल्यामुळे संकुचित होतो आणि त्यामुळे त्रासिक भावनांमध्ये गुंतून राहतो. भीती ही गूढ भावना आहे. तिच्या नदी, माणूस धावपळ करतो आणि सध्याची लागणारी मनाची स्वस्थता विसरतो. त्या अस्थिर अवस्थेत मग दृश्याशी तसे संबंध प्रस्थापित होतात आणि तसा परिणाम भोगला जातो. हे चक्र आहे, जे ओळखायला लागते.
कितीही त्रास झाला, तरी त्रासिक भावनांना हळुवार पद्धतीने भेटावे लागते, त्याचे ऐकावे लागते, ते काय सूचित करत आहे हे जाणून घ्यावे लागते आणि त्याचे काम झाले की त्यांना सोडावे लागते. बऱ्याच वेळेला काळजी, त्रास, चिंता ह्यामुळे मनात खूप व्याकुळता भरलेली जाते आणि त्यामुळे स्वस्थ भावनेला येण्यास जागा उरत नाही. स्वस्थता काही वेगळी गोष्ट नाही. इतर भावना विलीन झाले, किंव्हा सत्य ओळखता आले, की स्वस्थता आपोआप ध्यानात येते.
अहं वृत्ती मुळात विलीन होऊ द्यावी लागते. इथे _मी_ कुणीही पूर्ण नाही, किंव्हा निमित्त आहे. मर्यादा असल्यामुळे, हे सर्व दृश्य माझे नाही, पण भगवंताने योजिले आहे, म्हणून त्याच्या इच्छेने सर्व घडामोडी होणे अभिप्रेत आहे.
त्याला शरण जावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home