Thursday, August 27, 2026

श्री

 श्री 


भगवंताचे कार्य किंव्हा अस्तित्व माध्यम, हे जाणीव शुद्ध होण्याशी निगडीत असावे. गती, हालचाली ध्यानात येणे, आपण हा भाव प्रस्थापित होणे, संबंधित राहणे, स्थळ आणि काळ दिसून येणे, क्रिया करणे, स्मरण होणे - ही सर्व त्याची इच्छा ओळखावी. 

म्हणजे परिस्थिती आणि त्यातील घडामोडींना आकार देणारी शक्ती सूक्ष्म, विशाल, शांत आणि सत्य असावी, जी संतुलन राखत असावी. 

अस्तित्व गूढ आहे, आणि ते अवतरून विचार, भावना, संबंध, स्थळ, काळ अशा गोष्टी येत राहतात आणि त्यातून "मी" अशी भावना उदयास येते. त्या प्रवाहाच्या आसक्ती मध्ये राहून, त्यात मिसळून, त्यात हेतू घालून "मी" अशी जाणीव उदयास येत राहते. ह्याचा प्रश्न असा आहे मग - की प्रवाह कोण करतो, ते कसे होते, ते का होते आणि त्याच्या परिणामातून मी का होतो? 

वरील प्रश्न निर्माण होणे ह्यातून जीवाचा गुण धर्म कळत असावा. त्यातून शोध, मार्ग, सैय्यम, श्रद्धा अशा गोष्टी जीवनात/ ध्यानात/ अनुभवात संक्रांत होऊ द्यावे लागतात. त्यातून कृपेचे फळ येत असावे. त्यातून शांती साकार होत असावी.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home