श्री
श्री
चिंता, काळजीचे महत्व - मी म्हणजे कोण ह्याचा शोध प्रस्थापित होणे, प्रश्न पडणे, मनाचा स्वभावाचा स्वीकार होणे, कृपेचा अर्थ उमगणे, विचार आणि भावना चक्राचा स्वीकार होणे, हेतूचा अर्थ ओळखणे, मार्ग गवसणे, स्थिरतेकडे वाटचाल करणे, अवस्थांना सामोरे जात राहणे, श्रद्धा वाढणे....अशा सर्व गोष्टी सामावल्या असतात.
म्हणून चिंता आणि काळजीना टप्पा मानावा, त्यांना पुसून टाकण्याची गरज नसावी.
दररोजच्या जीवनात प्रवाह असा असतो की त्यात खूप विघटित स्वरूप जाणवत राहते आणि मन बऱ्याच ठिकाणी किंव्हा अवस्थेत जात राहते...ह्या स्वभावाला स्वीकारावे लागते. हालचाली, बदल, परावलंबन काही दोष नाही. ते मानण्यावर असते. भगवंत सर्व कार्य प्रस्थापित करतो, असा भाव आत्मसात झाला (वावर सुरू असताना देखील), तर _दोष_ तो कसला?!
आपण _वेगळे_ मानतो स्वतःला, म्हणून हा अखंड दृश्याचा अनुभव मनात संक्रांत होत असतो. ह्याला निर्मिती म्हणून ओळखावे. स्मरण देखील तसेच प्रस्थापित होते.
प्रस्थापित होत राहणे ही भगवत इच्छा ओळखावी. भगवंत सत्य आहे, मी निमित्त.
हरि ओम

0 Comments:
Post a Comment
<< Home