श्री
श्री
सर्व देत रहावे किंव्हा विलीनतेकडे जात रहावे किंव्हा विलीन होण्याचा भाव आत्मसात करावे किंव्हा शरण जावे किंव्हा कर्तव्य करावे किंवा सूक्ष्म व्हावे किंव्हा शुद्ध व्हावे...हा मार्ग आहे शांती संक्रांत होण्याचा आणि तो कुठल्याही परिस्थितीतून जोपासता येतो, कारण सर्व परिस्थिती किंव्हा स्तराच्या किंव्हा संबंधांच्या गाभाऱ्यात भगवंताची शक्ती स्थित असते.
जसे आपण बऱ्याच घटकेचे रूप धारण केलेले असते (किंव्हा जाणिवेत येत राहते प्रवाह सारखे किंव्हा प्रवास सारखे), तसे हे सर्व रूप आपण संपूर्ण अर्पण करू शकतो, त्यास शांत करू शकतो.
महत्वाची गोष्ट ही की शांत होऊ पाहणे म्हणजे *तरीही अस्तित्व राहणे आणि अस्तित्वात असणे*. अस्तित्व कायम असते आणि ते काही कमी किंव्हा जास्त होत नाही, हालचाली करत नाही, बदलत नाही, वेगळ होत नाही, तात्पुरते असत नाही - ह्या सर्व अस्थिर भावना शांतीत असत नाही.
एकदा हे ओळखले की शुद्ध अस्तित्व भाव कायम राहतेच आपल्यापाशी किंव्हा आपल्या आत, की मग त्याचा शोध श्रद्धेने होत राहतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home