Saturday, September 13, 2025

श्री

 श्री 


आपण भगवंताचे आहोत, हे जाणून घेणे. आपण जे इथे आलो, वावरत असतो, संबंधात येतो, बदलत राहतो, परिवर्तन पावतो, अनुभव घेतो, परिमाणात राहतो - ही पूर्ण त्याची इच्छा आहे. कश्यामुळेही अहं वृत्ती प्रज्वलित असण्याची गरज नाही. ती काल्पनिक आहे, म्हणून ते सत्य नाही. म्हणून तिला विलीन करता येते. त्याचे गाठोडे का सतत घ्यावे?! अस्तित्व भाव हे कुठलेही स्तरातील रूप नाही आणि त्यामुळे होणारे परिणामही नाही. म्हणून अनुभवांचे ओझे, परिणाम, भोग, परिस्थिती 'आपण' नाही. मी इथे का आलो, कसा आलो, कुठे जाणार, काय होणार, काय अनुभवणार, काय स्मरणात ठेवणार, कशी प्रक्रिया देणार - ह्याला हेतू का ठेवावा? भगवंताकडून येते, भगवंताकडे जाते, भगवंताची इच्छा आहे, भगवंताने दिलेले अनुभव आहेत. म्हणून भगवंत सुरुवात, मध्ये, शेवट - सर्व ठिकाणी, स्थळात, काळात असतो, हे पक्के मनात धरावे. 

हे मनाला सांगण्यासाठी सतत नाम घेत राहणे. नामाचे स्मरण ठेवावे. बदल, स्थळ, काळ, दृश्य ह्याने अजिबात व्याकुळ होऊ नये आणि स्वतःची व्याख्या _त्यामुळे_ करू नये. 

हरि ओम.


श्री 

स्पष्टीकरणाची अपेक्षा किंव्हा शुद्ध होण्याची अपेक्षा सुद्धा स्वतःला त्रास देऊ शकते किंव्हा कटु बनवते. संबंध, अनुभव, परिस्थिती, स्तर, बदल, भाव हे आपल्या वावरण्यात असणार. त्यातून परिणाम होणार, जिचा भाव तात्पुरतेपण असते. त्या भावनेचे पाया मुळे समजत नाही आणि कुठल्याही रूपात किंवा आकारात ते स्थित किंव्हा साठवलेले नसते. म्हणजे सर्व कार्य भगवंताचे आहे, हे स्वीकारणे. भगवंताचे आहे, म्हणजे त्याला सर्व अर्पण करावे आणि काहीही साठवू नये, कुठलाही हेतू बाळगू नये. हालचाली भगवंताकडून प्रकट होतात आणि तिथेच परत जातात.

बदलणारे असल्यामुळे मी आणि कुटुंबाशी संबंध बदलत राहतात. त्यात कैक तात्पुरते संकल्पना अनुभवात येतात. ते पुरवायला जाऊ नये आणि त्यातून स्वतःची व्याख्या करू नये. तब्येती, आजार, वृत्ती, शब्द, क्रिया, ह्याने व्याकुळ होऊ नये. त्यांना कार्य करण्या प्रमाणे बघावे.

कामात आपण खूप कमी पडू शकतो, पण सर्वांना पुरून उरणे, हे काही ध्येय नाही आपले. मी काही सांगितले, किंव्हा नाही, दृश्यात गोष्टी एका प्रकारे झाल्या किंव्हा दुसऱ्या प्रकारे, विषय वाटले, तरी त्याने व्याकुळ होऊ नये. जे दिसते, ते सर्वस्वी खरे नसते, म्हणून त्यात फक्त प्रयत्न अपेक्षित ठेवावे, फळ नाही. 

जवळच्या व्यक्तींचे वावरणे कसे होते, त्याने बेचैन होऊ नये. ते बोलतात, आपण ऐकावे आणि इथे कार्य संपते. मी काहीतरी करीन किंव्हा नाही, मी आता करीन किंव्हा नंतर, ह्याने आपण स्वतःला ठरवू नये. व्यक्तींचे व्यवहार त्यांच्या नशिबाने होते. आपले व्यवहार आपण निश्चयाने शांतीने करू. व्यक्तींचे जग भगवंतामुळे येते. त्याला आपण कारणीभूत मानू नये. त्या जगात आपला काय संबंध असतो, हे भगवंताच्या इच्छेवर असते, म्हणून शांत असावे. सर्व ठीकच असते, योग्यच होते. 

देह बदलतो, वाढतो, वाळतो, झिजतो. त्याचा परिणाम होऊ देऊ नये. दृश्यात येणाऱ्या सर्व गोष्टींचे तेच होते. त्यात आपली शांत टिकवावी. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home