श्री
श्री
विचार येत राहतात. त्याच्याशी संबंध कसे जोडतो आपण आणि त्यातून विचार दृश्याशी संबंधित कसे होतात हे बघावे किंव्हा ओळखावे. माझ्यात परिवर्तन होण्याची शक्ती आहे, म्हणून शुद्ध आणि सूक्ष्म होता येऊ शकते. त्यासाठी मनाचा स्वभाव कसा असतो, हे ओळखत राहावे.
मन म्हणलं तर संस्कार आले. धारण करणे आले, रूप धरणे आले, संगत ठेवणे आले. हे सगळं मनाच्या शक्तीतून प्रकट होते. म्हणजे इंद्रियांचे स्थान, त्याचा परिणाम, व्यवहार, स्थळ आणि काळाचे परिणाम, आपले बोलणे, आपले विचार, वगैरे सर्व काही मन घडवते आणि स्मरण प्रज्वलित ठेवते.
विचार चक्रामुळे एका स्थितीला किंव्हा भावनेला आपण धरून वावरतो. त्यात इतर गोष्टींचा ठाम पत्ता नसतो आणि ज्या गोष्टी अनुभवात येतात, त्यांच्याशी व्यवहार विचार चक्रातून होतो. थोडक्यात अहं वृत्तीमुळे "मी आणि माझे जग" ह्या पलीकडे काहीही घेणे देणे नसते. हा खूप स्वार्थी भाव झाला. कुणी कितीही काहीही म्हणा, मला जे पाहिजे ते ऐकू येतं आणि तशीच परिस्थितीचे रूप तैय्यार होते.
हा सर्व खेळ वृत्तीमुळे होतो. त्यावरून वस्तूंचा परिणाम, त्यांच्याशी संपर्क करणे, संपर्कात राहणे विचार आणि भावनेशी वगैरे प्रकार होतात. म्हणून वृत्ती जी वस्तूकडे असते, ती भगवंताकडे केंद्रित करावी. मर्यादा देखील वृत्तीमुळे असते.
विचारांचा उगम पलीकडून असतो, जो श्रद्धेने ओळखता येतो. बदल, स्थळ, काळ हे निरहेतू कार्य आहे अस्तित्व शक्तीचे. तसे घडत राहणार. त्याला पूर्ण स्वीकारावे.
विघटित विचार चक्रामुळे, जिथे बहिर्मुख ओढ अधिकाधिक होत जात आहे, आपले व्यवहार देखील खूप तुटत, एकलकोंडे, स्वार्थी, भीतीपोटी होतात. म्हणून जिथे जमेल, तिथे एकत्रीकरण भाव निर्माण करावे. Synthesis.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home