Tuesday, September 02, 2025

श्री

श्री 

विचारांचा, नव्हे अस्तित्वाचा *भाव* असतो, जे कार्य आहे, क्रिया आहे, संबंध आहे, परिणाम आहे, स्मरण आहे, अनुभव आहे, चक्र आहे. म्हणून शुद्ध आणि सूक्ष्म भाव होण्याचा मार्ग आत्मसात करायला लागतो. 

विचार हे संबंध आणतात आणि द्वैताची रचना होऊन त्या अनुभवात व्यवहाराचे स्थान निर्माण होतात. गोष्ट होणे, दिसणे, वावरणे, बदलणे, निघून जाणे आणि प्रभाव पडणे हे अस्तित्वातील अनेक घडामोडींच्या कारणामुळे होते. 

त्यातील एक स्थिती म्हणजे दृश्य जग, त्यातील विचार, त्यातील हालचाली आणि त्यातील परिणाम चक्र. म्हणजेच दृश्याचे स्थूल शक्तीचे परिणाम. मर्यादा, हा विचारांचा भाग झाला. त्यातून त्या पद्धतीचे स्मरण. विचारात डांग असताना, इतर वेगळेच संबंध जाणवत नाही पटकन. ह्याचा अर्थ मन एका पठडीतल्या विचार साखळीला, विचार चक्राला, संकल्प चक्राला सतत धरून वावरते. 

गोष्टी कसे होतात, ह्याचे अनेक स्तर आहेत, साखळी आहे. त्याचे बिंदू आणि त्याच्यामुळे परिणाम होतात, ही आपली स्थूल शक्तीची समज आहे. म्हणून बदलांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आपण सारखे करत असतो. ह्या सर्वांचे मूळ वृत्ती स्वभाव आहे, जी खूप सूक्ष्म असते आणि अदृश्य असते. अदृश्य शक्तीचा परिणाम तर आणखीनच विशाल, विलक्षण, सूक्ष्म असतो, जो कुठल्याही स्थळ आणि काळाच्या मर्यादांच्या साच्यात बसत नाही. 

म्हणून जी शक्ती अनुभवात पटकन कळत नाही, तिचे तरीही अस्तीत्व असतेच सूक्ष्म रूपात. अस्तित्वाला अनेक स्तर आहेत आणि अंतर्मुख होताना ते कळून येतात. 

आपण कोडी सोडवण्यासाठी आलेलो नाही आहे. आपण स्वतःला ओळखायला आलो आहे. कोण आहे मी? ह्याचे उत्तर घेण्याचा मार्ग आहे प्रपंचात योग्य मार्ग शोधत वावरणे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home