श्री
श्री
संबंध
विघटन केलं की नावीन्य भासते...पण त्यातून वेगळेपण, तात्पुरतेपण, अस्थिरपणा अशा सर्व भावना त्या प्रक्रियेत सामील होतात आणि त्यात आपण नाविन्य वस्तूला घट्ट धरून ठेवतो. आपल्याला हे लक्षात येत नसावे, की वस्तूला धरणे म्हणजे त्या बरोबर ज्या गोष्टी, भावना, विचार कारणीभूत ठरत असावेत ती वस्तू निर्माण करायला, त्या सर्वांना धरून ठेवणे!...
म्हणजे वस्तूंच्या मूल्यांना आपण धरत असतो...ती वस्तू फक्त त्या मूल्यांची "प्रतीक" समजावी. ते मुल्य बदलले की ती वस्तू आपल्या ध्यानी निघून जाते. म्हणजे मुल्य ते वस्तू असा सारा प्रवास आहे किंव्हा अस्तित्वाच्या स्थिती आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आपली वृत्ती कुठे गुंतुन राहिली असते, काय विघटन करू पाहते आणि त्यातून कशी परिस्थिती. होते हे ओळखावे. वृत्तीमुळे "धरणे" ही क्रिया होते, तसे स्मरण आणि भाव होते, तसे विचार आणि भावना होतात आणि तसा परिणाम आपल्या मनावर होतो. म्हणून परिस्थिती हे एक प्रतीक आहे आपल्या मूल्यांचे. परिस्थितीच्या पाठीमागे काय आहे, हे ओळखावे.
दुसरी गोष्ट ही की अगोदरच सर्वांचे प्रयोजन भगवंताने (त्याच्या गुणावरून) केले असते, म्हणून वरील क्रियांचा वावर आपल्या अनुभवात येतो आणि तसे विचार प्रकट होत राहतात. म्हणजे संबंधांचे स्वरूपाचे नियोजन भगवंताकडे ठरलेले असते, त्या प्रमाणे परिस्थिती, प्रारब्ध, भोग ह्या साऱ्या गोष्टी आपल्या वाटेस येतात.
पहिला विचार स्वतःकडून सुरुवात करून, विवेक बुद्धी वापरून "त्याग" (किंव्हा वैराग्य) ही संकल्पना आत्मसात करायला लागते. In other words - critical thinking and a place of inquiry/ question/ doubt/ identity crisis and so on.
दुसरी पद्धत आहे भक्तीची, ज्यामुळे आपुलकी भावना, शरणागती, सगुण ते निर्गुण हा प्रवास, स्वीकार द्वैताचा आणि अद्वैताचा, स्वीकार आपल्या मनाचा, प्रसाद, भोग, प्रारब्ध, कार्य, कर्तव्य, शांती रस, ह्या साऱ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. त्या मार्गात नामस्मरण बसते. In other words - surrendering and acritical perspective or transcental love.
दोन्ही मार्गातून भगवंत भाव आत्मसात होऊ शकतो, असे संतांचे सांगणे आहे.
दोन्ही मार्ग, स्वतःच्या अनुभवांना "टप्पा" म्हणून दर्शवतात.
त्या दोन्ही मार्गावरून प्रस्थान केले की प्रपंचात शांती भाव उमटते. मी कुठून आलो, काय करतोय, कुठे जाणार आणि संबंधित हालचाली, रूपे , आकार, नाती कशी येणार, हे पूर्ण भगवंताच्या शक्तीवर सोपवावे आणि आपण कर्तव्य करावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home