Tuesday, November 04, 2025

श्री

श्री 

संबंध जोडणे हा गुण आहे अस्तित्वाचा. म्हणजे त्याच गुणात एकत्रीकरण आणि विघटन असे दोन्ही *कार्य* होत राहते. ते अस्तित्व शक्तीचे वावर समजायचे. त्यामुळे होणारे अनंत रूप आणि आकार आणि त्यांच्यातील संबंध, गती, हालचाली, व्यवहार, हेतू, भाव वगैरे.

सर्व संबंधांना आपण "जाणीव" किंव्हा "भाव" ह्यात मोडू शकू. "असण्यामुळे" भाव तो राहणार, म्हणून संबंधांचे _रूप_ राहणार.  त्यामुळे होणारी क्रिया रुपाची आणि परिणाम आणि भोग. 

संबंध बऱ्याच स्तरात असते आणि स्तरांच्यातही असते. एका प्रकारे भगवंताचे कार्य म्हणजे संबंध प्रकट होणे, असे म्हणू. आपल्या मनात जे काही ढवळाढवळण चालू असते आणि त्याचा परिणाम होत असतो, ते त्या गूढ संबंधातून प्रज्वलित राहतो. म्हणून सर्व स्वच्छ मनाने स्वीकारणे कार्य, हे आपल्या हिताचे ठरते. त्या मूळ कार्याच्या जाणिवेतून आपण प्रपंच कर्तव्याने पार करावा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home