Wednesday, November 05, 2025

श्री

 श्री 


भाव हा आतून उमटत असावा. भाव म्हणजे अस्तित्वाचा अर्थ, जो सर्व स्तरातून, साखळीतील, स्मरणातून, संबंधातून उमटतो. भाव म्हणजे भगवत शक्तीचे कार्य, जे आपण स्मरण किंव्हा वृत्ती म्हणून भोगतो आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपण झेलतो! 

इथे दोन वेगळ्या स्थिती दर्शवल्या आहेत - भाव आणि स्मरण. हे दोन्ही अस्तित्वातील वावरण्याच्या स्थिती आहेत. भाव, हे शांती रस संक्रांत करते, स्मरण, हे अस्थिर आणि बदलणारे ठरते. भाव अंतर्मुख असतो, स्मरण काही प्रमाणे बहिर्मुख (परावलंबी) बनतो किंव्हा तसा प्रकट होतो. भाव स्वतः सिद्ध असत, स्मरणाला सिद्ध करण्याची गरज असते. भाव क्रिया करत नाही, स्मरत हेतू बाळगून क्रिया करत राहतं. 

भाव आत्मसात होण्यासाठी स्वतःवर क्रिया करायला लागतात जे म्हणजे नामस्मरण. 

हरि ओम.


श्री 

रूप आणि आकार, बहिर्मुखपणा, मी नाही. स्थळ आणि काळ, बहिर्मुखपणा, मी नाही. चक्र, बहिर्मुखपणा, मी नाही. 

प्रत्येक कृतीचा आत - बाहेर परिणाम असतो. परिणाम शब्द हा तसा असावा, ज्याला दोन्ही बाजूचे परिणाम असतात. त्याला द्वैताचा स्वभाव म्हणू. 

माझ्या बाबतीत म्हणून खूप बडबड करणे, किंव्हा स्पष्टीकरण देत राहण्याचा परिणाम ओळखावा. माझ्यात स्पष्टीकरण क्रिया खूप आतून, विचार मंथन करून, भावना बघून बाहेर येते. आत काय खळबळ चालू आहेत, ते सांगावे, असे वाटते. प्रश्न आतून असतात, तात्पुरते भाव, भीती, आतून येते. ते मांडले तर त्वरीत त्याची मोडतोड होते. तसे अभिप्रेत नसते मला. काहीतरी मांडल्यावर, त्यावर इतरांनी लगेच प्रतिक्रिया व्यक्त करावी, अशी अपेक्षा नसते. 

मोडीस नेण्यात काहीच गरज नसते, पण ते होते. आणि मोडीस नेले, तर त्याचे परिणाम मी आत नेतो, ज्याची गरज नसते. ह्याचा अर्थ असा होतो की शांतीने बघावे सर्व चक्रांकडे आणि त्यावरून काहीही प्रश्न मांडले गेले किंव्हा सांगितले, तरीही त्यांनी व्याकुळ होऊ नये. 

हे पचवण्यासाठी मला वाटते, भगवत भाव आत्मसात करणे आले. किंव्हा ह्या स्वतःच्या प्रक्रियेला, न दोष देता, न अपेक्षा धरता, न न्यून बाळगता, शांतीने स्वीकारावे आणि तसे कार्य करत राहावे. ह्या कार्यावरून स्वतःला दुसऱ्यांनी लेखण्याची गरज नाही आणि मी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home