श्री: बिंदू
श्री: बिंदू
वासना एकच नसते आणि भरपूर वासना चिकटून एखादी
परिस्थिती किवा पदार्थ किवा वस्तू किवा अनुभव निर्माण होत राहतात. त्या वासना
बर्याच जन्मान पासून येत असाव्यात, बदलत असाव्यात, मिसळलेल्या असाव्यात आणि पुढेहि
जात असाव्यात. त्या वासनांच मुळ केंद्र स्थान शोधून काढणे हे बुद्धीच्या
आवाक्याच्या बाहेर आहे आणि त्यातून आपण विचार करत राहतो आणि गोलगोल फिरत राहतो.
त्याला विचार चक्र म्हणतात आणि सर्व जग अश्या चक्रा मध्ये गुम्फवलेल गेल आहे.
मुळ गोष्ट आहे ती म्हणजे “वासना” किवा जे भगवंता
मध्ये निर्माण होत आणि ज्याला आकार येतो किवा दृश्य स्वरुपात प्रकट होत. अस लक्षात
येईल कि आपण त्रास करून घेतो, तो सर्व एका बिंदूच्या शोधा मध्ये उद्भवतो – आपण तो
बिंदू मानतो आणि त्यात पूर्णपणे स्थिरपणा आणण्याचा प्रयत्न करत राहतो. आपण स्वतःला
एक स्वतंत्र बिंदू मानतो, जो केवळ आभास आहे. जे काही आहे ते वासना उद्भवणे आणि
मावळणे आहे आणि ते सुद्धा एकाच भगवंता कडून. जर विचार करत बसलो तर हाती काहीही
लागत नाही आणि एक चक्र निर्माण करत राहतो. जितका स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न
करू, तितकाच आपला बिंदू टणटणीत आणि निगरगटट होतो आणि सुसाट फिरत राहतो.
बिंदू असणे त्रासदायक आहे आणि डोकेदुखी आहे. ह्याच्या
उलट विशाल होतहोत वासना शांत करणे आपल्याच हिताच आहे कारण तोच आपला मुळचा स्वाभाव
आहे.
शुद्ध होणे गरजेच आहे आणि त्यानेच वासना शांत होऊन एकच
भगवंत प्रकट होतो. शुद्ध म्हणजेच सत्य म्हणजेच पवित्र म्हणजेच सूक्ष्म म्हणजेच
एकमेव म्हणजेच अद्वैत. त्याची सुरवात स्वीकारण्यात आहे गोष्टींची. गोष्टी स्वीकारल्या
म्हणजे त्यांच्या पाठीमागच्या वासना आपल्याला चिकटत नाही आणि ते गळून पडतात
(त्यांचा प्रभाव आपल्यावर राहत नाही किवा त्या आपल्या मध्ये वेगळ्या वासना निर्माण
करत नाही). म्हणजेच दृश्याचा परिणाम आपल्या मनावर मावळतो. म्हणजेच बदल का होतात,
कुणा मुळे, कशासाठी – अशे प्रश्न विचारण्याची गरज राहत नाही. म्हणजेच कुठल्याही
परिस्थितीत आपण समाधानी राहतो.
समाधानी असणे म्हणजे जाणवणे कि आपण फक्त अस्तित्वात
असतो – वासना येतात आणि जातात पण त्यातून “मी” सिद्ध होत नसतो किवा “मी” कुठल्याही
बिंदूवर निर्भर नसतो. “मी” सर्वांपासून निराळा असतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home