Saturday, July 22, 2023

श्री: आत आणि बाहेर

 

श्री: आत आणि बाहेर

चांगलेपणाची सुरुवात कुठून करायची? सर्व गोष्टींची पहिली माहीत करून घेतल्यावर सुरुवात होऊ शकेल का? त्याच उत्तर आहे “गरज नाही”. आपण कसे विचार करतो, किवा विचार निर्माण कसे होत राहतात – हे एक गूढ प्रकरण आहे – त्याने आपल्याला पूर्ण सत्य माहीत नाही होणार आणि म्हणून “चांगली कृती आणि चांगल वर्तन आणि चांगली भावना आणि शुद्ध अंतःकरण” ह्याचा निर्णय परिस्थितीशी जोडू नये. वर्तन किवा कृती किवा विचार किवा अनुभव – हे खूप आतून  - म्हणजे वासनेतून येत असत म्हणून आपल्या कृतीचे परिणाम कसे होतात आणि त्यातून आपण देखील कसे बदलत जातो ह्याचा ठाम पत्ता आणि ठोस पुरावा कुणीच देऊ शकत नाही (आपण सुद्धा!). हे एकदा पचीनी पडल कि आपल्याला चांगलेपणावर श्रद्धा ठेवायला लागते. श्रद्धा आपल्यात पाहिजे, ती बदल घडवून आणते आणि आपण शुद्ध होत जातो. ते कस, अस विचारण्याची गरज नाही.

दुसरी गोष्ट अशी कि जे दिसतं आणि जे सांगितल जात आणि जे बुद्धीच्या तर्काने मांडल जात किवा व्यवहारात येत ते फार “वरवरच असत”. आपण कॉम्पुटर वापरतो. पण ते बनवण्यासाठी, चालवण्यासाठी आणि टाकून देण्यासाठी खूप काही कष्ट वातावरणाला सोसायला लागतात – हे कुठे आपण विचार करतो का? किवा EV गाड्या आपल्या जीवनाचा घटक होण्यासाठी वातावरणात किती कष्ट निर्माण झाले असतात? डोळ्या समोर कुणी बोलून नाही दाखवलं किवा सगळ “स्वच्छ दिसलं” म्हणून ते बरोबर आहे अस काहीही नाही.

अशी भूमिका आपण नात्यांना देखील लाऊ शकतो. एखाद्या माणूस काही बोलला नाही किवा शांत राहिला ह्याचा अर्थ सगळ मजेत आहे त्याच्या बद्दल, अस गृहीत धरता कामा नये. आणि एखाद्याने दोन शब्द जास्ती सांगितले तरीही त्या रागाचा हेतू आणि कारण त्या क्षणापुरताच आणि आपल्यामुळेच उद्भवत असतो असा विचार निर्माण करण्याची गरज नाही. म्हणजे जो पर्यंत अभिमान किवा त्याला कारणीभूत असणारी वृत्ती निर्माण होत राहते, तो पर्यंत आपले विचार, भावना आणि कृती “वरवरचेच” राहतात आणि त्रास निर्माण करतात. म्हणून दिसतं ते वृत्तींमुळे आणि अनुभव घेतो ते हि वृत्तींमुळे आणि तश्या वृत्ती खूप सूक्ष्म असल्यामुळे परिस्थितीशी कस समोर जाव हा प्रश्न निर्माण होत राहतो. आणि वृत्ती कशी असते आणि ती पुढे + वर येताना काय घडवते – हे सांगणे आणि आकलन करणे सोप्प नाही. आपल्याला हे काही दिसतं नाही म्हणून भीती वाटते.

ह्या सर्व निर्मितीच मुळ स्थान शोधून काढायचं ठरवल तर तो प्रवास आपल्याला भगवंताकडे आणेल. म्हणजे कि तो आपल्याला शुद्ध करेल आणि आपण स्वतः भगवत्स्वरूप होऊन जाऊ. तर सर्व गोष्टींच्या पाठीमागे आणि पुढे – भगवंताची इच्छा प्रज्वलित असते. आपण भगवंत म्हणजे “अस्तित्व” अस समजू. अस्तित्वामाध्येच सर्व काही शक्ति साठवलेली आहे किवा मुळातच त्या माध्यमात वृत्ती उद्भवण्याची क्रिया कार्यरत आहे. आपल्याला भीती वाटत असते ती म्हणजे वृत्तीची. तर तस वाटून घेऊ नये. वृत्ती आहे भगवंताची तर आपण त्यावर श्रद्धा ठेवून सर्व काही कार्य करत रहावं आणि शांत होत रहावं.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home