श्री: नकळत
श्री: नकळत
हरि ओम – ह्या शब्दामध्ये सर्व काही आहे. आज सकाळी
विचार आला कि आपण जे बघतो, कृतीत आणतो आणि अनुभव घेतो – ते कस होत असावं आणि ते का
घडत आणि कुठल्या माध्यमामुळे घडत राहत? असा विचार सुकून देऊ शकतो जर जाणवलं कि नकळत
बर्याच गोष्टी “निर्माण” होत राहतात आणि बदलत राहतात. आणखीन सखोल अर्थ असावा कि नकळत
अस्तित्व असतच आणि त्यच्या स्वभावामुळे निर्मिती होत राहते. निर्मितीला हेतू असा
नाही, उद्देश असा नाही, काय सिद्ध करायचं अस काहीही नाही. निर्मिती फक्त आहे आणि
एका शक्तिमुळे किवा एका चालानामुळे ती उद्भवते.
स्वीकारणे आणि श्रद्धा ठेवणे – हे दोन्ही अंग ह्या
जाणीवेतून निर्माण होत असाव्यात. वृत्ती शांत “होणे” ह्याला महत्व आहे. वृत्ती
निर्माण होणे, ती प्रभाव टाकणे आणि ती शांत होत जाणे – ह्या सर्व गोष्टी
भगवंतामुळे होतात. वृत्तींची शक्ति आणि निर्माण क्षमता विलक्षण असते आणि या
शक्तीला देणारी चालना स्वतः भगवंताकडेच साठवलेली आहे. अस्तित्वामुळेच बदल,
परावलंबन, रात्र, दिवस, एका पाठोपाठ एक एक गोष्टींची गुंतागुंतीतली निर्मिती अश्या
गोष्टी घडत राहतात.
आपल्या बाबतीतही आपण कशे निर्माण झालो, काय वृत्ती
घेऊन आलो आहे, कुठल्या भूमिकेत आपण अनुभव घेतो, आपण कशे वावरतो आणि कसा विचार करतो
– हे सर्व पाहिलं तर अद्बूत आहे. अद्भुत जर आहे, तर तक्रार करण्याची काहीच जरुरी
नाही! एखादी गोष्ट अशी का घडते आणि आपल्याला काय वाटत आणि त्यात आपल काय कर्तव्य
असत हे गूढ रसायन आहे जे फक्त तात्विक दृष्ट्या किवा बुद्धीने तर्क पूर्णपणे लाऊ
शकत नाही. मुळात वृत्ती आणि गोष्टी घडू द्याव्यात आणि आपण स्थिर राहावं. त्यातूनच
आपल्याला योग्य वाट दिसून येते. ती वाट म्हणजे काहीही असेल आणि त्यात कुठलाही
तर्क, कृती, भावना, विचार योग्य असेल जर ते आपल्याला शांत करू शकेल तर.
म्हणजेच कि आपला अभिमान मावळला पाहिजे आणि सर्व
श्रद्धा भगवंताला उद्देशून आपल्या हातून कार्य घडायला पाहिजे.
शेवटची गोष्ट अशी कि वृत्ती, मन, शरीर हे गूढ प्रकरण
आहे. त्या गूढत्वामुळे आपण बघतो, विचार निर्माण होत राहतात, आत खोल वृत्ती
उद्भवतात आणि परत आपण कृती करतो. ह्या रसायनावर श्रद्धा ठेवणे जरुरीच आहे. प्रश्न
आपोपाप सुटतील, सर्व काही घडायचं आणि चांगल व्हायचं ते होणारच कारण आपल्या जवळ अस्तित्व
आहे. आपण भगवंताकडून आलो आहोत.
हरि ओम.
श्री: जग
सर्व गोष्टी किवा जग वेगळ आहे. ते एकमेकांमध्ये
गुंतलेल आहे. सर्वांचा मुळ एकच आहे पण तो वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतो. आपण
समजून घेतो म्हणजे हेच कि वेगळेपणा आहे आणि मिसळलेल प्रकरण आहे आणि शेवटी “तेच”
आहे. त्यातूनच सर्व कुटुंब समभाव अशी वृत्ती निर्माण होऊ शकते.
बर्याच देशांमध्ये वरील गोष्टींची जाणीव दूर ठेवून
सर्व राहिवास्याना “एका साच्याचे पुतळे” अस घडवण्याचा कल अमलात आणलेला दिसतो. म्हणजे
मुळचा अस्तित्वाचा स्वाभाव न स्वीकारता “हम बोले सो कायदा” अश्या थाटामाटात
देशांचे प्रतिनिधी राज्य करतात. आणि हाच परिणाम आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा
येत राहतो.
हा खूप गहन प्रश्न आहे – वृत्तीतून आलेला. वास्तविक
वरील चुकीच्या धोरणेचा परिणाम असा दिसून येतो कि “कुत्र्याने चावा घ्यायचा नाही,
किवा सापाने डन्क मारायचा नाही किवा बाळाने कुठेही शी किवा शु करायची नाही!” – अस
काहीस संबोधित आहे. भावना किवा स्वभाव कुठल्याही साच्यामध्ये कोंडून ठेवता येत
नाही. पाणी म्हणल तर जमिनीत मुरणारच, ते पसरणारच आणि नदी म्हणून उद्भवणारच आणि शेवटी
समुद्रात जाऊन मिसळणारच – तो “दोष” म्हणून का म्हणायचं?
वास्तविक सर्व गोष्टी वृत्तींमुळे होत असतात आणि
त्यातूनच वृत्तीना शांत करणे मोलाच कर्तव्य आहे आपल. का म्हणून साच्या मध्ये जगावं
आपण? आपण “नाही” केल काम आणि निवांत आराम केला तर काही आभाळ कोसळणार आहे का? एखाद्या
दिवशी भिंतीला नीळा रंग दिला तर काय हरकत आहे का?
परत विषय आहे – आपण कोण आहोत आणि परावलंबनपणा उद्भवणे
म्हणजे काय...? भलेही जग असेल, भलेही वृत्ती असतील, भलेही नाती अश्या प्रकारे
असतील – आपण त्यांच्याशी संबंध कुठल्या प्रकारे निर्माण करायला हवा?
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home