श्री: भगवत्स्वरूप होण्याचा प्रयत्न
श्री: भगवत्स्वरूप होण्याचा प्रयत्न
उद्या काय होईल माहीत नाही, परिस्थिती काय घेऊन येईल
हे सांगणे निश्चित नाही आणि आपण कसे असू हे ही ठाऊक नाही. हे प्रश्न बुद्धीचे
आहेत, भगवंताचे नाहीत. बुद्धी निर्माण होते वृत्तीतून आणि वृत्ती होत राहते
भगवंताच्या अस्तित्वामुळे. अस्तित्व म्हणल तर ह्या सर्व गोष्टी आल्या. म्हणून
माणूस होणे अपरिहार्य आहे त्या बरोबर जे काही वृत्ती दाखवतात आणि समोर जायला भाग
पाडतात हे सुद्धा महत्वाच आहे. आपण एका प्रकारे निर्माण होतो, हि गोष्ट नाकारून
चालत नाही आणि त्या मोहा मध्ये पडुनही चालत नाही. त्या निर्मिती मध्ये आपल्याला
वृत्ती, विचार, भावना, शरीर – ह्या सर्व गोष्टी दिल्या गेल्या आहेत, जे भगवंताचच आहेत. चालवणारा विश्व “तो”, निर्माण
करणारा “तो”, मावळणारा “तो” - सर्व
काही तोच करत असतो त्याच्या अस्तित्वामुळे. आपल्याला त्याला भेटायच असेल
तर आपल अंग विषयातून, चिंतेतून, अभिमानातून, मायेतून काढून त्याच्या दिशेने
वळवायला हव. हि एक क्रिया आहे – त्या मध्ये पूर्ण मनुष्याच स्वरूप वापरल जात –
म्हणजेच कि त्यात वृत्ती, विचार, भावना आणि कृती सर्व काही आल आणि त्यावरून
आपल्याला भगवंताकडे पोहोचायला लागतं. आपल्याला जगाच आकलन मर्यादेत होत राहत – आणि जग
म्हणल म्हणजे एका प्रकारे अस्तित्व भासून येत. त्याचा एक स्वभाव कळतो – जो म्हणजे
बदल, परावलंबन, विचार करणे, भावना उमटणे, शरीर वापरणे वगैरे. त्या स्वभावाचा
परिणाम म्हणजे आपण चिंताग्रस्त होतो आणि भीती वाटत राहते. तसं वाटणे म्हत्वाच आहे. एका मर्यादे पर्यंत आपण
सर्व प्रश्नांना भिडत राहिलो कि मन भगवंताच अस्तित्व मानायला लागत. अस का, ह्याच
उत्तर कुणाकडे नाही. भगवंत आहे – तो फक्त आपल्याला जाणवतो का – हा प्रश्न आहे.
त्याच महत्व वाटणे हि देखील मोठ्ठी क्रिया आहे,
ज्याला बराच काळ जाऊ शकतो. काळ काय आणि स्थिती काय – हि मनाची अवस्था आहे.
आपल्याला ठरवायचं आहे कि प्रवास किती शीघ्र करायचा आहे. प्रवासा मध्ये बर्याच घटना
घडत राहतील, बरेच व्यक्ती भेटतील, बरेच रस्ते सापडतील...पण तो एक प्रवासच आहे
मनाचा किवा आपल्याला कळलेल्या अस्तित्वाचा. हे विसरून चालणार नाही.
त्यासाठी, ध्येय निश्चित करायला हव आणि ते ध्येय आहे
भगवत स्वरूप होणे. एकदा ते ध्येय निश्चित केल, कि त्यावरून हलता कामा नये – कितीही
वेळ लागला तरीही आणि कुठलीही परिस्थिती आली तरी. त्यासाठी वाट्टेल ती किम्मत
द्यायला आपण तैय्यार असायला हवं.
दुसरी गोष्ट अशी कि आपल्या मनावर आत वृत्तींचे
संस्कार होत असतात आणि आपल्याला ते कृती करायला भाग पाडतात. हे शांतपणे
स्वीकारायला लागत. ह्याचाच अर्थ कि दुख होईल, यातना सोसायला लागतील एकटेपणा येईल,
सिद्धी मिळतील, सुखाचे क्षण येतील आणि मावळतील – सर्व काही होईल. ह्या सर्व
गोष्टीना स्वीकाराव लागत आणि त्याच आकलन करायला लागत, चिंतन करायला लागत, पुरेसा वेळ
द्यायला लागतो आणि पुढे जात रहायला लागत. मारून मुटकून किवा जोरात कुठेतरी आदळून
हाती काही लागेलच अस नाही. अभिमान जाळण्याची किंमत जि द्यायला लागते, ती द्यायलाच
लागते, भलेही त्याला अमाप वेळ देणे अपरिहार्य होत असावं.
श्रद्धा ठेवणे गरजेच आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home