श्री
श्री
अस्तित्व, हि जाणीव खूप महत्वाची आहे. हे सांगण्याची
गरज पडू नये कि आपण अस्तित्वात असतो. आपण असतोच...फक्त त्याचा अर्थ काय हे
आपल्याला कळत नाही. “अर्थ” फक्त बौद्धिक पातळीला न राहता, तो वृत्ती, विचार, भावना
आणि शरीर ह्या माध्यमातून समजून घ्यायला लागतो. आपण “मी” संबोधित जेव्हा समजतो,
तेव्हा वरील सर्व अंगे मिळून आपल्या जाणीवा निर्माण करतात आणि बदलत राहतात.
म्हणजेच कि अस्तित्व हा विचारांचा विषय नसून सर्व अंगांचा विषय आहे, किंबहुना
“विचार” सर्वांगीण अंगातून व्हायला पाहिजे, फक्त बुद्धिमत्ता कामाची नाही.
ह्यावरून अस दिसून येईल कि बुद्धीमत्तेला जितक प्राधान्य देऊ, तितक वागणुकीत
“कृत्रिमपणा” येऊ शकतो. त्यातूनच “स्पर्शाच” महत्व, “ऐकण्याच” महत्व, “विवेक
शक्तीच” महत्व, “भावनेच” महत्व कळून येत. बाकी सर्व अंगांना दुय्यम स्थान देऊन
फक्त बौद्धिक पातळीला महत्व देणे - अस
आचरण आपल्याला फसवल्याशिवाय राहणार नाही.
जि व्यक्ती किवा देश किवा संस्था अशी बौद्धिकच
व्यवहार करते, ती नुक्सान आणते स्वतःवर आणि जगावर. “संस्कृती” किवा “निर्मिती” म्हणल
तर त्याचा पाया सर्व अंगांना भिडायला पाहिजे आणि त्यात सर्व गोष्टींची सरमिसळ
असते, पण श्रद्धा साठवलेली असते. मुख्य प्रभाव असा कि भावनेची जाणीव न ठेवणे आणि
त्यातूनच एकटेपणा, लहरीपणा, बेफिकीरपण, आगाऊपणा, टोकाच स्वतंत्रपणा अश्या अनेक
वृत्ती निर्माण होतात. हे सर्व घातक आहे – स्वतःला आणि जगाला. अन्न, वस्त्र,
निवारा देणे (जरी हे मुलभूत गरजा असतील) तरी ते देताना काय वृत्ती निर्माण होत
आहेत हे हि बघणे महत्वाच आहे. आपण प्रेम निर्माण करत आहोत की गाठी? कारण जे काही “आत”
निर्माण करत आहोत, त्याचेच परिणाम बाहेर उमटून येणार आहेत.
आज असा काळ आहे कि आपल्या अनुभवांची उजळणी होत आहे –
नेमक कुठून विचार निर्माण होत राहतात आणि ते कशे बाहेर व्यक्त होतात – ह्या
गोष्टींचा मागोवा घेतला जातोय. ह्या सर्व आकलनाचा “हेतू” श्रद्धा मध्ये रुजलेला
असावा, दुसर्यांवर “ताबा” मिळवण्यासाठी नाही.
नेहमी प्रमाणे, मला महत्वाच्या विषयाकडे बोलायची
इच्छा आहे आणि ती आहे वृत्तीची. वृत्ती निर्माण होत राहते आणि तिचं रुपांतर सर्व
अंगातून (बुद्धी, भावना आणि शरीर) ह्या मध्ये घडून येत आणि तीच आपल्याला जागाचा
अनुभव देत राहते. आपण जे काही करतो, ऐकतो, बघतो, समजून घेतो – त्या सर्व गोष्टींच
मुळ “अस्तित्व भावनेत” आणि त्यावरून वृत्ती मध्ये सापडत. म्हणजेच कि अनंत काळ
गोष्टी निर्माण होत राहणार, आपण होत राहू, अनुभव होत राहतील आणि सर्व गोष्टी बदलत
विलयास येतील आणि हे चक्र कायम राहील. हेच सत्य पचवायच आहे. माझ्यामुळे काहीच होत
नसत कारण मी सुद्धा एक वृत्ती म्हणून निर्माण झालो आहे – भगवंता मधून आलो आहे आणि
त्याच्याकडेच जाणार आहे. कुठल्याही गोष्टीच नियंत्रण फक्त भगवंताकडेच (किवा
अस्तित्वाकडेच) आहे.
श्रद्धा ठेवावी.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home