श्री: अपूर्णता
श्री: अपूर्णता
अपूर्णता आणि भीती आणि तात्पुर्तेपणा हे आपल्याच
वृत्तीतून उद्भवलेल्या भावना आहेत. त्या भावनांना शबदात मांडून शांत करता येत नाही
किवा कृती केली तरी ते शांत होतीलच असं नाही. हे सर्व एका भगवंताकडून आलेल्या
गोष्टी आहेत आणि हे सर्व गोष्टी “संकल्पातून” आल्या आहेत. तस पाहिलं तर भगवंत किवा
अस्तित्व अस माध्यम आहे कि त्यात वृत्ती उद्भवणार आणि त्या संकल्प, मन, बुद्धी,
शरीर तैय्यार करणार. सूक्ष्म किवा अदृष्यातून दृश्यात अवतरणे आणि परत गडप होणे –
हा खेळ भगवंताची शक्ति करत राहते आणि म्हणून त्या शक्तीकडे ज्ञान आणि क्रीया देखील
आहे. आपण शांत राहिलो तर ह्याचा मागोवा लागेल, नाहीतर आपण चक्रात अडकू. ह्याचाच
अर्थ असा कि जीवनात जे जे काही होत त्या मागे भगवंताची इच्छा आहे अशी श्रद्धा
ठेवणे आणि म्हणून आपण अशेच का, अशी परिस्थिती का, पूर्वी काय वाटत होत, आता काय
वाटतंय, पुढे काय लिहून ठेवल आहे, परिस्थिती बरी राहील का वगैरे – ह्या गोष्टींची
काळजी करू नये. पूर्वी काय आणि आत्ता काय आणि पुढे काय – ह्यावरून आपण ठरत नसतो
आणि समाधानही ठरत नाही. समाधान हा गोष्टींचा विषय नाही. आणि समाधानी असणे म्हणजेच
कि वृत्ती शांत होणे. त्यासाठी मनाला शांत राहण्याचं वळण द्यायला लागत आणि ते
नामस्मरणाने होत, असा संतांचा उपदेश आहे. शांत होण्या मध्ये बुद्धी, भावना, क्रिया
काहीही आड येत नाही. आड जर काही आलच तर ते अभिमान. सर्व विश्व भगवंत चालवतो हि
श्रद्धा वाढवली कि कशाचीही भीती वाटणार नाही. स्थळ आणि काळ त्याचा शांत
होण्यामध्ये काहीही संबंध नाही. तसचं, सूक्ष्म होणे हि आत उतरण्याची क्रिया आहे जि
बाहेर सांगता येत नाही आणि इतर जणाना कळेलच असही नाही. बदल जो काही होतो तो
स्वतःला कळून येतो. तो काय बदल आहे, ती सांगण्याचीही गरज नाही.
दुसरी गोष्ट अशी कि वृत्तीन्बद्दल दुसर्यांना उपदेश
केला तर तो दुसर्यांना पचनी पडेल किवा आवडेल किवा कळेलच अस काहीही नाही – उलट
आपल्यावरती डाफरतील. त्याचं कारण अस कि वृत्ती काय परिणाम पाडतात हे कुणाला कळत
नसत पण एवढ नक्की जाणवत कि ते परिणाम पाडत आहे आणि भीती निर्माण करत आहे. त्या भीतीपोटी
लोक वाट्टेलते आसरा शोधून घेतात आणि आसरा नसेल तर तो निर्माणही करतात! म्हणजेच कि “सत्य”
काय आहे ती कळून घ्यायची आणि ऐकण्याची तैय्यारी आपली नसते आणि आपणच “विषयात” गुंग
झालेलो असतो - हे ऐकायला आवडत नाही, कारण त्यात
आपल पितळ उघड पडत कि आपला विचार पूर्णपणे फोल आहे आणि उगाचच शक्तिमान असल्याचा
केविलवाणा प्रयत्न आपण करत राहतो! तरीही आपण सुधारत नाही! ह्यालाच “माया” सामोधीत केल
आहे. जि गोष्ट जशी आहे (सत्यरुपात) त्यापेक्षा भलतच समजून घेणे म्हणजे माया.
संत तोच जो वृत्तीन्बद्दल काहीही उल्लेख न करता
आपल्याला विषयातून बाहेर आणतो आणि आपल्याला शांत करतो, आणि सत्य दाखवतो. कुठल्या
वृत्तींमुळे अर्जुन युद्ध करायला घाबरला, हे जरी कृष्णाला जाणवलेल होत, तरी त्याने
खूप वेगळ्या पद्धतीने अर्जुनाला उपदेश करून युद्धासाठी प्रेरित केल. म्हणजे भीती
किवा वृत्ती खूप खोलवर परिणाम करत असते जि आपल्याला देखील कळत नाही. म्हणूनच
नामस्मरण वरती श्रद्धा ठेऊन आपण विषयाधीन होत नाही आणि शुद्ध होत भगवत्स्वरूप होऊन
जातो.
श्रद्धा ठेवावी, सर्व काही उत्तमच होईल...
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home