श्री: देव आणि जग
श्री: देव आणि जग
देव आहे हे निश्चित आहेच. त्याशिवाय आपण आलो नसतो आणि
जग झाल नसत. बदल झाले नसते आणि परावलम्बन जाणवल नसत. आणि ह्या सर्वांमध्ये आपल
कार्य घडल नसत. शांत होण्याचा मार्ग आणि देवत्व होण्याचा मार्ग सरळ कदाचित नसावा
आणि प्रत्येक स्थिती मधला मार्ग वेगळा असला पाहिजे. ह्याचाच अर्थ असा कि सर्व
स्थिती भगवंताकडून आल्या आहेत. त्या स्थितींना “शांत” केल कि भगवंत दिसतो किवा आपण
भगवंत होतो. कधी कधी वाटत राहत कि हा मार्ग बुद्धीच्या तर्काने शोधून घेता येईल,
कधी कधी हा मार्ग जास्ती भावनीक वाटत राहत आणि कधी कधी कार्य मध्ये गुंतून घेतलं
कि सत्य कळेल अस वाटत. सर्व मार्ग एकमेकांमध्ये जोडले गेले आहेत आणि आपण फक्त एक
मार्ग किवा एक विचार “धारा” धरतो ज्यावरून इतर मार्गांच्या गूढ अवस्था कळतात.
चित्र अपूर्णच भासत राहत आणि ह्यावरून कळायला हवं कि निर्माण होणे हि एक प्रक्रिया
आहे. विचार येतात आणि मावळतात आणि आपल्याला अनंत आकार आणि बदलणार जग दर्शवतात.
वस्तू किवा परिस्थितीच “दर्शन” होणे म्हणजे त्याला निर्माण करणे आपल्या वृत्तीतून.
आणि वृत्ती सूक्ष्म असते जि खूप काळ तशीच राहते आणि जी भगवंताच्या शक्तीचा नमुना
असते.
आपले विचार थांबत नाहीत आणि ते आपल्याला सतत काहीतरी
करायला भाग पाडतात. करणे थांबत नाही आणि ते समाधान देत नाही आणि आपण करत राहतो काही
ना काहीतरी. आपल्या हातात न आत्ताचा क्षण आहे न पूर्वीचा होता न उद्याचा असेल.
सध्याच सत्य अस आहे कि आपण वेगवेगळ्या स्तरांमधून
कार्य किवा विचार करत राहतो. जे आपल्याला वाटत राहत – ती एकच स्थिती आहे विचारांची
आणि भावनांची. पण त्याचा संबंध आतल्या वृत्तीमधून आलेला असतो जिथे जाणीवा फार
वेगळ्या असतात. आणि वृत्ती देखील एका भगवंताच्या स्थितीतून आलेल्या असतात (किवा
निर्माण होत राहतात). ह्याचाच अर्थ आपल जग हे भगवंत + वृत्ती + विचार + शरीर ह्या
मधून जाणवत राहत. प्रत्येक स्थिती मधील आकार वेगळे, विचारांचा स्वभाव वेगळा आणि
भावनांचं म्हणणे वेगळ. ते इतक्या वेगळ्या आहेत कि एका स्थितीची भाषा दुसर्या
स्थितीला कळत नाही - फक्त एकमेकांचा संबंध जोडून ठेवते. म्हणून आपण काहीही विचार
केला तर ते आतल्याआत वृत्ती मध्ये आणि शेवटी भगवंतापर्यंत जातात. म्हणजेच कि आपले
विचार सर्व जगाला परिणाम पाडतात. दुसर अस कि भगवंताच्या अस्तित्वामुळे, वृत्तीनं
चालना मिळते जि ‘वर’ आल्यावर ‘विचार’ म्हणून त्यात परिवर्तन होत आणि ज्याला आपण मन
आणि बुद्धी म्हणत राहतो. म्हणजेच कि समोरच्या घडामोडींना चालना कुठून येते? भगवंताकडून.
काळ आणि स्थान हे हि भगवंताच्या संकल्पनेतूनच घडत राहत. अस जरी असल तरीही आपल्या
सध्याच्या मनाच्या स्थितीवरून एका प्रकारची भाषा ऐकू येते – सगळी नाही. सर्व भाषा
ऐकू यायला प्रयास करायला लागतो आणि तो म्हणजे भगवंताच स्मरण.
जे काही घडत राहत, जे काही आपण “अनुभव” म्हणून जाणून
घेतो, जे काही चिंता वाटत राहते, जे काही आपण विचार चक्र निर्माण करत राहतो, ते
वरच्या पार्श्वभूमीवरून होत राहत. म्हणून ह्या सर्व आकलनाचा अर्थ असा कि आपण शांत
रहायला शिकायला हवं. जो काही अट्टाहास वाटत राहतो, आरडाओरदा होत राहतो, आवाज जाणवत
राहतो, त्रास होत राहतो, चिंता वाटत राहते, हे “वरच्या” स्थितीत राहण्याचे परिणाम
आहेत. आपण खोलवर गेलो कि वेगळ्या भावना येतात आणि जसजस खोल जात राहतो तसतस शांत
होत जातो. आपल्याला नेहमीच दोन गोष्टींना सामोर जायचं आहे – एक म्हणजे दररोजचे
जगाचे व्यवहार करत राहणे आणि दुसर म्हणजे खोल जात राहणे. ह्यातूनच आपल्याला शांत
होण्याचा मार्ग दिसून येईल – बुद्धी किवा भावना किवा कार्य – कुठलाही चालेल.
श्रद्धा ठेवा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home