Wednesday, August 16, 2023

श्री: वाट शोधणे

 

श्री: वाट शोधणे

भगवंत हि एक वस्तू नाही आहे, किवा ती होण्या करता अनेक वस्तूमधल प्रेम - ही भावना केंद्रित करायला लागते. प्रेम हि भावना कुठल्याही गती किवा आकाराच्या पलीकडे आहे (पलीकडे जाते/ परावलंबन होत नाही/ हेतू नसतो/ शंका नसते/ भीती नसते/ अहंकार नसतो/ वृत्तीतून नसते). म्हणजेच ती स्थळ आणि काळाच्या चौकटीच्या पलीकडे जाऊ शकते.

आपले सर्व व्यवहार स्थळ आणि काळाच्या चौकटीतून सुरु होतात पण तिथेच मर्यादित राहिले तर आपण माणूसच राहू आणि असंख्य जन्म घेऊन सुद्धा आपल्या विकासात काही फरक पडणार नाही. स्थळ आणि काळ हि अस्तित्वाची एक स्थिती आहे जि बदलत राहते, पण जि परमात्मावस्तू मधून घडत राहते. स्थळ आणि काळ – ह्या “वस्तूच” आहेत आणि त्यांचा स्वभाव आहे. त्याचा निर्माता कोण? तर भगवंत. आपल्या मनातल्या सर्व वृत्तींचा उगम आणि प्रश्न आणि कार्य – हे देखील स्थळ आणि काळाच्या अस्तित्वामुळे उद्भवत राहतात, पण ह्या सर्वांच खर अस्तित्व भगवंतावर सर्वस्वी अवलंबून आहे. स्थळ आणि काळाला स्वतंत्र अस्तित्व नाही – तसच आपल्या मनालाही नाही. म्हणून जे दृश्य जग आपल मन अनुभवत ते सत्य नसत किवा तात्पुरत ठरत आणि असंख्य हेतू किवा वृत्तींमुळे उद्भवत राहत. जो वृत्तींचा स्वभाव, तोच दृश्य जगाचा.

तरीही, भगवंत होणे हि एक अखंड प्रक्रिया ठरते. भगवंताची शक्ति आणि ते होण्याच ज्ञान खूप गूढ आहे. अशक्य नाही, पण गूढ आहे. सुक्ष्मतेच अस्तित्व आहेच, त्याची शक्ति सर्वव्यापी कार्य करत राहते आणि तीच पूर्णपणे जग चालवते. त्या अस्तित्वाची जाणीव आत्मसाद करणे हे आपल कर्तव्य आहे, तरच पूर्ण समाधान लाभेल. समाधान हि स्थिती आहे, बाकी सर्व स्थिती अशांत ठरतात. विश्वा मध्ये द्वैताची रचना असल्यामुळे, भगवंताच्या शक्तीच्या व्यतिरीक्त, स्थूल शक्तींचा वावर आणि परिणाम आपल्या बुद्धीवर होत असतो. अस का हे ठाऊक नाही. भगवंत हि जाणीव मनुष्य स्वतः मध्ये वाढवू शकतो आणि कदाचित दृश्य जगातूनच त्याच्या वाटा शोधून घ्यायला लागतात.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home