Saturday, August 19, 2023

श्री: अपेक्षा

 

श्री: अपेक्षा

एखादी गोष्ट मी सांगितली किवा नाही किवा कुठल्या शब्दात मांडली गेली आणि कुणासाठी आणि केव्हा – हे विचार करणे पूर्ण आनंद देत नाही. कारण आपण स्वतः मुळात अपूर्ण असतो म्हणजे पूर्ण सत्य माहीत नसत आणि जे काही होत राहत ते अपूर्ण सत्यच्या आधारे होत राहत – म्हणून ते आपल्या गुंतून ठेवत. ह्या सर्व जाणीवा धिक्कारुन चालत नाहीत तरीही. हि मनस्थिती आहे जि स्वीकारावी लागते आणि स्वीकारणे हि देखील एक मोठी क्रिया आहे. म्हणून भगवंताच स्मरण, वृत्तींची उद्भवती, त्यांचा परीणाम, सूक्ष्माच अस्तित्व ह्या भावना जाणवल्या कि आपण शांत होत जातो.

गोष्टी होत राहतात – मी असेन किवा नसेन; कारण मी स्वतः खरा नाही आणि माझ्यावरून काही जग चालत नाही. कुठल्याच बाबतीत माझ्यावर गोष्टी अवलंबून नाही तर माझ्या भावना आणि विचार परिस्थितीवर का अवलंबून ठेवावेत? काहीतरी करणे अपेक्षित असत का? काय अपेक्षा आहेत स्वतः कडून? अपेक्षा ठेवणारा ‘मी’ कोण? अपेक्षा म्हणजे तरी काय आणि तिला आपण एवढे महत्व का देत राहतो?

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home