Friday, August 18, 2023

श्री: सर्वांची भाषा एक करावी

 

श्री: सर्वांची भाषा एक करावी

विचार करणे सुटत नाही आणि ते करत रहावं अस वाटत. विषय तुम्ही निवडा कारण त्या विषयायच्या रुची मधूनच भगवंताची वाट असावी. मन म्हणल तर विषय आलाच आणि त्यावरून प्रश्न आले, बदल आले, परावलंबन आल, आणि वृत्ती आल्या, अनेकपणा आला, कर्तेपणाचा अभिमान आला, आणि शांत करण्याची गरज निर्माण झाली. हे कदाचित गरजेच असावं. कारण भगवंत आपल्याला दृष्याच्याच्या पलीकडे जाऊन शोधावा लागतो.

आजकाल बुद्धी भेद इतका झालेला दिसून येतो कि बुद्धी स्थिर राहणे अवघड झालेलं आहे. विचारांचा वेग आणि सत्यपणा आपण ठरवतो. वेग कमी केला किवा वाढवला तरीही भगवंत हाती लागेल कि नाही हे प्रत्येकाने ठरवावं.

असो. भगवंत सोडून काहीही केल तरी मन आणि शरीर “कष्टी” होतात – म्हणजे आपल्याला त्रास, भय, चिंता, अशांती लाभते, म्हणजे वृत्ती अजूनच फोफावतात. कुठलाही कार्य आणि विचार भगवंताला स्मरून करायला लागतो तरच तो आपल्या शांत करतो.

शांतीचे अनेक अर्थ आहेत – वृत्ती शांत होणे, कामात लक्ष केंद्रित करणे, अभिमान जाळणे, मदद करणे, श्रद्धा वाढवणे, सत्य ओळखणे, प्रेम करणे, एक होणे किवा समरस होणे, खम्बिर होणे आणि इतर काही. कुठल्याही गोष्टीला वेळ द्यायला लागतो – मनात विचार आला म्हणजे लगेच परिवर्तन होईलच अस नाही. अर्थात परिवर्तन आतल्याआत होत असतातच (सूक्ष्म पातळीवर) पण त्याचा परिणाम सर्व स्तरांवर व्हायला वेळ द्यावा लागतो – कारण सर्व काही एकच आहे आणि सर्व पातळ्यांची भाषा एकच सत्य बोलते तेव्हा आपल्याला भगवंत दिसतो. म्हणजेच प्रत्येक शब्दाची आणि अनुभवाची किवा भावनांची भाषा निरनिराळी असते प्रत्येक स्तरावर. हे सर्व भाषा एकमेकात गुंफून आपल्याला जग दाखवत राहतात. म्हणून शांत व्हायला वेळ लागतो आणि भगवंत दिसायला श्रद्धा खूप प्रखर आणि खोलवर उद्भवायला लागते. सध्या सर्व पातळ्यांची भाषा “अभिमानाला” धरून आहे म्हणून आपल्याला दृश्य जग दिसतं राहत आणि ते अत्यंत खोल ठिकाणी जाऊन परिणाम करत राहत. त्याला हलवण्यास किवा ढिले करण्यास सहाजिकच खूप काळ द्यावा लागेल.

सर्व गूढ प्रकरण आहे एकंदरीत. आपण हे का करतो, कुणासाठी, कशासाठी, आपण कोण आहोत, हे जग म्हणजे काय, कोण भगवंत, त्याचा आणि माझा काय संबंध आहे – निश्चित हे प्रश्न पडणार आणि त्याची उत्तरे सोप्पी नसावीत. जो कोण म्हणत कि त्याला भगवंत कळला आहे, मला शंका आहे कि त्याला नक्की तरी कळला आहे का?! भगवंत कळला किवा आपल्याला सत्य कळल हे सांगण्याची गरज नाही – आपल्या कार्य मुळे सिद्ध होणारच.

आपण श्रद्धा तेवढी वाढवावी – खोलवर जाऊदे आणि सूक्ष्म पातळी पासून ते स्थूल पातळी पर्यंत मनाचं परिवर्तन होऊदे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home