श्री: वेळ घ्या.
श्री: वेळ घ्या.
खरच, आपल्याला दुसर्यांच्या मनातल कळत का? कळण्याचा
तरी प्रयत्न करतो का? का आजकालच्या आवेगामुळे आणि गती मुळे आणि भरमसाठ कामांच्या
यादीमुळे हि सूक्ष्म गरज दुर्लक्षित केली जाते?
आपल्या मनात बर्याच सूक्ष्म घडामोडी (वृत्ती) निर्माण
होत असतात आणि ते इतर बर्याच वस्तूंशी आणि गोष्टींशी आणि आकारांशी आणि प्रकृतीशी
निगडीत असतात. “प्रकृती” हा छान शब्द आहे कारण त्यात “दिसणारी वस्तू” अभिप्रेत
नाही – पण त्याच्या निर्मितीच्या पाठीमागचे उलाढाल अभिप्रेत आहेत. ते उलाढाल
बर्याच स्थळ आणि काळाच्या स्तरावर होत असतात आणि म्हणून एकमेकांशी संबंध किवा नात दर्शवत
असतात. थोडक्यात म्हणायचं तर आपण श्रुष्टी म्हणून एकचं आहोत. त्यावरून ओघाने आलच
कि प्रकृतीचा उगम काही ठोस कारणामुळे होत नसतो आणि प्रकृतीच्या बळावर सर्व काही
कळू शकत किवा सर्वांशी नात निर्माण होऊ शकत.
ह्या संकल्पनेचा प्रभाव आपल्या वागणुकीत जाणवायला
हवा. थोड जरी विचार केला कि सध्याचा ताण कसा निर्माण होतो, त्याच कारण “वेळ आणि
स्व” ह्यावर केंद्रित असाव. कुठेतरी पुढे जात रहावं, मिळवाव, अजून जोरात काहीतरी
करत रहावं, सांगत रहावं, सिद्ध करत रहावं – हि वृत्ती उंचावत आहे. त्या मध्ये online
रहाण्याचा आणि तंत्रज्ञान माहितीचा परिणाम मानसिकतेवरती खूप होत आहे ह्यात शंका
नाही. ह्या बद्दल कुणी विचार मीमांसा करण्याचा प्रयत्न तरी केला आहे का?
आपल्याला सध्याच जीवन आणि तंत्रज्ञान माहिती “स्वस्थ”
बसू देत नाही. “स्वस्थ” बसणे किवा असणे हि मनाची स्थिती आहे. त्यात माझ/ तुझ/
अधिकार/ वेळेची टंचाई/ हिशोबी असणे/ व्यावहारिक रहाणे/ उज्व-डाव/ नजर अंदाज करणे
अश्या काहीही कृती नसतात. वेळेचा अभाव जाणवल्यामुळे आपण इतरांशी बोलणे चक्क टाळतो,
समजून घेण्याची क्षमता मर्यादित ठेवतो, ऐकून घेत नाही, त्वरित बदल घडण्याची
अपेक्षा ठेवतो, अपेक्षांचं डोंगर चढवतो आणि अपेक्षा भंग सहन करू शकत नाही, रागवतो,
नंतर क्षमाही मागत नाही आणि आणखीन बराच काही वेड्यासारखं वागत राहतो. आपण कसे वागत
सुटलो आहोत ह्याच देखील भान ठेवत नाही – नाहीतर आपल्याला कळून चुकेल कि कितीतरी
वेळा, कितीतरी मन आपण दुखावली आहेत.
अस का होत असेल? कुठेतरी आपण असा विचार करतो कि माझ
आणि इतर वृत्तींच काहीही नात असण्याची गरज नाही. हे फार घातक आहे. आपल्यापेक्षा
दुसरा जीव किवा परिस्थिती हि खूप वेगळी असू शकते आणि ती समजण्यासाठी विलक्षण सैय्यमाची
गरज भासू शकते. काही माणसांच्या समस्या खूप सूक्ष्म पातळीच्या असतात (मानसिक/
शारीरिक दुखणे) आणि हे कळण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आणि सहानुभूती देण्यासाठी
आपल्याला स्वतः त्या पातळीपर्यंत जाऊन सूक्ष्म व्हायला लागत. ह्यासाठी वेळ नको का
काढायला? का ह्यावरून मला काय मिळणार आहे, अस विचार करून माणसांना तोडून टाकायला
पाहिजे? तसं म्हणल तर आपल्याला काहीच मिळत
नसत आणि प्रत्येक गोष्टी फायदा-तोटा असा विचार करत बसल तर डोक्याला त्रासचंत्रास मिळत जाणार आहे. मुलाचं जग, सध्याच्या
परिस्थितीचा मानसिकतेवर परिणाम, वार्ध्क्यांची समस्या – हे न बोलता येण्याचे विषय
आहे आणि तरीही आपण सैय्यमाने समजून घेऊ शकतो.
कुठल्या पद्धतीने आपण “आधार” म्हणून होऊ शकतो? उत्तर
देण्याच्या आधी इथे स्पष्ट करायला हरकत नाही कि हि काही “वेगळी” (unique) विचार शरणी नाही आहे, कि त्याच्यामुळे कुणाला बक्शिस
मिळेल वगैरे. एक तर मनसोक्त सर्व काही बोला – सर्व भावना व्यक्त होऊ द्या, त्या
भावनांचा असा ठोकताळा असू नये, आणि कुठलाही
भावनांवर बंधन असू नये, मन कुठेही भटकू द्या – एखादा मुद्दा सांगण्यासाठी
थेट बोला किवा फेरफटका मारून त्या मुद्द्याला हाथ घाला. न्यून बाळगू नका, लगेच उत्तर
देण्याच टाळा, हाथाने स्पर्श करा, डोळ्यात बघा, काहीही न सांगता एकमेकांच्या समोर
बसा, एकत्र काम करण्याच्या पर्याय शोधून काढा वगैरे. म्हणजे कुठल्याही विचारांना
आणि भावनांना बंधनात जकडू नका आणि त्याच तोल्मापन करून नका किवा स्वतःला त्यावरून
धर्यावर धरू नका. एक जमाना होता कि वेळेच नियोजन करायला खूप महत्व होत कारण नियोजन
नसेल तर गोष्टी नीट होणार नाही अस असायचं. पण आता इतक्या भरमसाठ गोष्टींना तोंड
द्याला लागत आहे कि “नियोजन” ह्या शब्दाचा नवा अर्थ शोधून घ्यावा लागत आहे – तो अर्थ
म्हणजे कदाचित जे महत्वाच वाटतंय तेच करणे, योग्य तितका वेळ देणे, वेळेची संकल्पना
लवचिक ठेवणे, घाई न करणे, शंका न धरणे किवा श्रद्धा वाढवणे.
वरील विचार भावनांच्या पातळीवरून मांडलेले आहेत.
त्याला अध्यात्मिक वळण सुद्धा देणे शक्य आहे. खोलवर भीती आपल्याला खुपकाही करायला
भाग पाडते आणि भीतीचा उगम वृत्ती मध्ये असतो. त्यावरून अभिमान येतो आणि आपण विचारांच्या
चक्रात अडकतो. जसं चक्र वाढत जात तस आपण एकलकोंडे होतो आणि दुसर्यांच्या
अस्तित्वाची जाणीव अजिबात रहात नाही. त्या स्थितीला बदलायचं असेल तर भगवंतावर आपली
श्रद्धा वाढवल्या सिवाय पर्याय नाही.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home