Saturday, August 19, 2023

श्री: स्थिर राहणे

 

श्री: स्थिर राहणे

विचार निर्माण करतांना आणि त्यावरून आतल्याआत निर्णय घेण्याच्या प्रक्रीये मध्ये बरच काही उलथापालथ होत असते किवा असावी. सूक्ष्म होत जाणे म्हणजे हि उलथापालथ जाणवणे आणि त्यावरून आपण स्वतःला कारणीभूत किवा धर्यावर न  धरणे! काही विचार येतांना, जेव्हा आपण शब्द ऐकतो, तेव्हा आपण हे हि विचार चक्र निर्माण करतो कि – वेळ वाया चालला आहे का?; का मी इथे वेळ देत आहे?; माझ अस म्हणण नव्हत त्याला; मी हे काम करायला पाहीजे होत; माझ्यामुळे ह्यांना त्रास झाला; मी अपुरा पडलो; उद्या काय होईल?; जे मी करत आहे त्याचा परिणाम उद्या साठी योग्य ठरेल का?; मी स्वार्थी आहे का?; मी स्वार्थी नाही आहे!; ते चुकले आहेत!; मी बरोबर आहे!; मला नीट शब्दात मांडता येत नाही माझ्या भावना; नाही मांडता आले भावना तर मी त्यांच्या लेकी अपुरा ठरीन का?; मी वेगवान नाही तर मी अपुरा ठरलो का?; माझ्याकडे पैसा बेताचा आहे तर तो पुरेल का?; मी अस वागत आहे कारण पूर्वी अश्या घटना घडून गेल्या होत्या आणि मला सुरक्षित व्हायचं आता; ह्या क्षणात आणखीन कितीतरी गोष्टीना मी मुक्त आहे, तर मी मागे नाही का पडणार?; मी आत्ताचा घेतलेला निर्णय योग्य आहे का कि जुनी परिस्थिती बरोबर होती?.....

असे असंख्य विचार सतत मनामध्ये घोळत राहतात. ह्याचा अर्थ हे सर्व विचार आपल्याला बेचैन करतात आणि त्यामध्ये राग, काळजी, मीच अस्तित्व भावना, अहंकार, अज्ञान भासत राहणे, ते पूर्ण करण्याचा अट्टाहास, सिद्ध करण्याचा अट्टाहास, खूप काही मिळवण्याचा अट्टाहास, खूप व्यस्थापन करण्याचा अट्टाहास, दुख, नाईलाज, उणीवा – ह्या गोष्टी दिसून येतात.

हे मान्य असेल तर पुढचा प्रश्न असा आहे कि हे विचार का निर्माण “होत राहतात”? आणि त्या विचारांचं आणि परिस्थितीच काय नात असत? आणि ते नात आपण प्रयत्नपूर्वक बदलू शकतो का?

ह्या सर्वाच उत्तर अध्यात्म मध्ये आहे. अध्यात्म म्हणजे मनस्थिती बदलण्याची प्रक्रिया हातात घेणे. ती अस म्हणते कि सर्व गोष्टी वृत्तीन्मधून, प्रकृतीमधून घडत राहणार आहेत आणि भगवंत हा एकमेव सत्य आहे आणि तेच आपल खर स्वरूप आहे. अस असल्यास, गोष्टींच कर्तेपण आपण स्वतःवर ओढून घेतो म्हणून वरील सर्व विचार येतात. करत आपण नाही, वृत्ती आहे. त्या का निर्माण होतात त्याच ठोस उत्तर आपण देऊ शकणार नाही, म्हणून वृत्ती फक्त बघायच्या असतात, त्यातून गोष्टींना खर मानणे किवा कार्याला चिकटणे अभिप्रेत नाही. आणि हेच शिकायचं असत. दुसरी गोष्ट कि सर्व एकच आहे, म्हणून वेगळेपणाने वागणे बरोबर नाही किवा कुठलातरी अहंकारग्रस्त हेतू बाळगून कार्य करणे योग्य नाही. करता भगवंत आहे, म्हणून सर्व गोष्टींचा उगम आणि बदलणारी शक्ति भगवंताकडेच आहे. निर्माण होण्याची शक्ति म्हणजे भगवंत.

तुम्ही निर्धास्त रहा. भगवंताची आठवण जोपासा आणि कार्य करत रहा. तो योग्य आपला सांभाळ करेलच.

हरि ओम.   

0 Comments:

Post a Comment

<< Home