श्री: प्रवास
श्री: प्रवास
आकार देणे हि क्रिया तुझ्या
अस्तित्वामुळे प्रत्ययास येते. वृत्ती, गुण, विचार, भावना आणि शरीर हे “आकार” होण्याचे
साधन आहेत आणि एकावर एक लेप चढवून दृश्य जग निर्माण करतात. म्हणजेच कि एक एक लेप
आपण काढले कि दृश्याची रचना बदलते (आपली मनोधारणा बदलते) आणि शेवटचा लेप काढला कि
जे “उरत” किवा “राहत” किवा कायम असत ते म्हणजे सत्य, शाश्वत, स्थिर, आनंद, अनंत,
आकारहीन - “श्री”. “काहीच नाही” म्हणजे
दृश्यातीत होणे आणि स्वच्छ आनंद असणे कुठलही कारण नसतांना - म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र अस अस्तित्व. It is to become Existence without any form. This means that a
‘form’ is a dimension of Existence that is perceived in and through
and as space and time. “In” means that perception occurs in a
given fabric of perception – perception and fabric are inseparable.
“Through” means that the same fabric has made us, which is also externally
present. And “as” means the representational and the represented language of
Existence is the fabric itself, which is again in terms of space and time. Hence
our own creation, mode of operation (which is perception) and the medium of
operation (space and time) speak the same language. In other words, the inner
world and the outer world and the relationship of the two are interlinked. Therefore,
what we are concerned is the “relationship” (or collaboration) of any two
things that make a phenomenon – you and me or inside and outside or past and the
present or vernacular and modern or lived experience and abstraction etc. Abstracting
this equation further, we arrive at a “sequencing of perceived variables”. As long
as a variable “seems to exist”, we are indicating at least two variables, along
with their relationship and the observer! So much for Oneness!
Now the question
is how is bliss or peace achieved? And the answer to this is - it is NOT
through any perceived variables! Yet to achive this state of transcendence
where variables “need not” exist; we need to start with whatever we have and
whatever we think we are (how much ever incompleteness we may be experiencing
at the moment).
हि स्थिती येण्यासाठी मधले टप्पे
आणि विचारांचं स्वरूप ध्यानात घ्यायला हव म्हणजेच ते टप्पे ओलांडता येऊ शकतील. आपण
काळजी करतो, त्रास भोगतो आणि चिंता करतो. ह्याच उत्तर शोधून काढा. हे विचार का
निर्माण होतात आणि कुठून येतात आणि त्याला आपण का आपल्या मनात आश्रय देतो? त्यातून
अहंकाराच (त्याला “जीव” असही संबोधित केल आहे) स्वरूप कळून येईल, किती खोलवर
प्रकरण आहे ते हि कळायला लागेल आणि दृश्याची संकल्पना काय आहे हे हि कळू लागेल.
त्यातून कळेल कि जीव हि मनाची स्थिती आहे आणि परमात्मा हि देखील मनाची स्थिती आहे.
म्हणजेच आपल्याला प्रवास जीवापासून ते परमात्मा पर्यंत करायचा आहे. तोच आहे
प्रवास, दुसरा तिसरा कुठलाही नाही!
असो, तर आपल्याला सध्याच्या
स्थितीत कार्य करणे भाग आहे आणि सतत भगवंताची जाणीव जागृत ठेवणे आवश्यक आहे. जाणीव
देखील भावना आहे – त्याच स्वरोप विशाल आहे आणि फक्त शब्दाला पकडून नाही. ह्याचाच अर्थ
कि आपल्या हातात प्रयत्न आहे, बाकी सर्व त्याच्या इच्छेने होत. प्रयत्न करतातंना
बर्याच भावना मनात उद्भवत राहतात, त्यांना पार करून योग्य ती कृती करणे महत्वाच
आहे – त्यातूनच भगवंताच विशाल स्वरूप जाणवेल. आपण जो पर्यंत मनातल्या भावना पार
करत नाही, तो पर्यंत दृश्यातीत भगवंत प्रकट होत नाही/ दिसणार नाही. म्हणजे जि काही
भीती, राग, दुख आहे, ते समजावे आपले “टप्पे”. त्यांना सामोरं जाऊन पलीकडे जायचं
आहे. पलीकडे जाणे म्हणजेच मनस्थिती बदलणे, म्हणजेच भगवंतस्वरूप होणे, म्हणजेच
श्रद्धा वाढवणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home