श्री: प्रतिक
श्री: प्रतिक
तुझ्या बद्दल विचार करणे आणि
त्याचा अर्थ भावेंच्या लेखी आणि कुर्तीच्या लेखी काय होतो, कसा उमटतो हे देखील
समजत राहावे. सर्व ठिकाणी तु आहेस, कुणी वेगळ नाही आणि म्हणून वृत्ती काय, विचार
काय, भावना काय आणि शरीर काय – ते तुझच प्रतिक आहे. साहजिकच त्या प्रतीकचा स्वभाव
आकारुनसार बदलत राहतो. जे दृश्यात जाणवत तो झाला “स्वभाव” किवा “गुणधर्म” आणि
त्यामुळेच परावलंबनाची स्थिती, संकल्पनाच क्षेत्र, हेतूची व्याख्या, दृश्याच
स्वरूप, ‘मी’ ची व्याख्या निर्माण होत राहते. म्हणजे ज्या गोष्टी ‘मला’ दिसतं
राहतात, आणि ‘मी’ संबोधित होतो – ते सर्व तूच आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचा
प्रवास तुला शोधण्याचा आणि आत्मसाद करण्याचा आहे – त्या पुढे अनेक्पणाने जग दिसेल,
पण त्याला चालना देणारी शक्ति तुझीच आहे. सर्वांच्या “पलीकडे किवा पाठीमाडे” तूच
विलसित आहे.
श्रद्धेचा स्वभाव नेहमी “पलीकडच्या
शक्तीला” अस्तित्वात आणणे, असा असतो. किवा तिच्यावर आपण आपल सर्वस्व अर्पण करणे
असा देखील होतो. म्हणून विचार आणि श्रद्धे मध्ये फरक असतो. विचारांमध्ये बुद्धीभेद
आणि अहंकार असतो – ती स्थिर राहत नाही. श्रद्धा विचारांच्या पलीकडे/ उर्ध्वस्थिती
किवा अगोदर असल्यामुळे ती नेहमीच स्थिर आणि अनंत असते – तिला कुठल्याही गोष्टीची
सांगड घालण्याची जरुरी राहत नाही. म्हणजेच कि शुद्ध आणि सत्य अस्तित्व होणे म्हणजे
श्रद्धा विस्तारलेली होणे.
आपल्या मनात श्रद्धा संक्रांत
व्हायला हवी. त्यातुंच विचार आणि भावनाच स्वरूप घडायला हवं. आपण जे विचार आणि
भावना ‘स्वतंत्र’ समजतो ते तसं नाही आहे = ते सर्व एका भगवंताहून उद्भवत राहत. आपण
विचारांना आणि भावनांना “मी” म्हणतो किवा “जीव” म्हणतो – आणि हे सर्व निर्माण
होण्याच्या प्रक्रियेमध्ये अंतर्भूत आहे. म्हणून बदलांना आपण घाबरतो आणि त्याला खर
मानून कार्य करत राहतो. अस का व्हायला हव हे बुद्धीच्या आकल्नेत बसत नाही म्हणून
दृश्य जग आपल्याला पूर्णपणे संतुष्ट किवा समाधानी बनवू शकत नाही. जो पर्यंत “मी”
हि संकल्पना आहे, तो पर्यंत दुखःला आमंत्रण आहे मनामध्ये.
ह्या सर्व वस्तुस्थितीच उत्तर आहे
कि तुझ नाम घेत राहावे आणि श्रद्धा वाढवावे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home