Tuesday, October 03, 2023

श्री: भाव

 

श्री: भाव

भाव हे अस्तित्वाच एक स्वरूप किवा स्वभाव आहे. मुळ सत्यातला भाव आहे “अस्तित्वाचा”...ज्याला शांत आणि आनंद सम्बोधीत केल आहे आणि जो अनंत असतो आणि कधीही बदलत नाही (स्थिर असतो). ह्याचा अर्थ कि हा भाव असतोच आकारांच्या पलीकडे आणि म्हणून तो सर्वात मूळ वस्तू आहे. त्या भावनेतून इतर सर्व भावना तैय्यार होतात आणि त्यांना एक आकार मिळतो. ह्याचा अर्थ कि वृत्ती भावनेला बदलवते आणि त्याला एका आकारात किवा दृश्यात आणते. म्हणून कुठल्याही दृश्य वस्तूच्या मागे भाव असणारच किवा भाव कारणीभूत ठरेल. आपल्या दररोजच्या जीवनात भावना स्थिर नसल्यामुळे आपल्याला अनेक आकार दिसतं राहतात.

भावना एका प्रकारे अस्तित्वाचा स्वभाव आहे, जसा आकारात येणे हा देखील स्वभाव आहे आणि विचार असणे. ह्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या असतात म्हणून स्थिर होणे म्हणजे सर्व बाजूने स्थिर व्हायला लागत. स्थिरता असणे हे शक्य आहे  आणि ते आकारांवर ठरत नाही किवा अमुक एक परिस्थिती पाहिजे असही नाही. सर्वांच्या पलीकडे होणे म्हणजे “भाव”.

लोकांना उगाच वाटू शकत कि आपण विलीन झालो कि भावनेच काय? विलीन झालो तर भगवंताची कृपा झाली अस समजावे कारण त्याच प्रक्रियेमध्ये कोटी कोटी प्रमाणात आनंद निर्माण होतो. विचार किवा भावना ह्या बद्दल बुद्धिभेद करण्यात तसा अर्थ नाही. “स्थिर” होणे हे आपल ध्येय आहे – त्यामध्ये विचार आणि भावनांची प्रक्रिया आलीच आणि त्याचा शेवट म्हणजे “भाव” होणे.

हरि ओम.   

0 Comments:

Post a Comment

<< Home